जातीवाचक शिवीगाळ प्रकरण

मुलीचा मोबाईल फोडला, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल

Caste abuse case: मानोरात मुलीचा मोबाईल फोडल्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. या घटनेत आरोपींनी पीडितेचे वडिलांना मारहाण केली.

मुलीचा मोबाईल फोडला, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल

Caste abuse case

मानोरा (Caste abuse case) : तालुक्यातील एका गावातील मुलीचा मोबाईल फोडला, मोबाईल का फोडला असे विचारले असता लाथा बुक्क्याने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी अक्षय धनराज जाधव व संजय धनराज जाधव यांच्याविरुद्ध मुलीच्या वडिलाने ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून (Caste abuse case) पोलिसांनी ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार मागील ३ महिन्यापासून काही संबंध नसताना गावातील अक्षय जाधव याने माझ्या मुलीला मानोरा येथील कॉलेजच्या रस्त्यावर दि. १३ एप्रिल रोजी भेटून तिला धक्का मारून तिच्याजवळील मोबाईल फोन घेऊन तो फोडून आणून दिला. 

१५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान गावातील बौद्ध विहारजवळ अक्षय जाधव हा दिसला. मी त्याला मुलीचा मोबाईल का फोडला असे हटकले असता मी तुमच्या मुलीला किडनप करून टाकतो. तसेच तिचा पत्ताही लागू देणार नाही, अशी धमकी दिली.  व लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू करून त्याच्या हातातील काठीने डोक्यावर मारून जखमी केले. तसेच संजय जाधव हा हातात काठी घेऊन धावत आला. अन त्याच्या भावास मारून टाक पाहून घेऊ असे सांगत जातीवाचक शिवीगाळ केली. (Caste abuse case) मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये वरील २ आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

मानोरा पोलिसांची कारवाई; १६ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत! 

मानोरा पोलिसांची कारवाई; १६ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत! 

Manora Police Action: मानोरा पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले १६ मोबाईल फोन पोर्टलच्या माध्यमातून शोधून काढण्यात मानोरा पोलिसांना यश आले.

Nov 06, 2026
बेंगळुरूत भीषण हत्याकांड! पत्नी, सासूसह सासरच्या सात जणांची हत्या; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात

बेंगळुरूत भीषण हत्याकांड! पत्नी, सासूसह सासरच्या सात जणांची हत्या; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात

बेंगळुरूत कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासरच्या सात जणांची हत्या; सात वर्षांच्या मुलाचाही समावेश. आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात.

Nov 06, 2026
राज्यातील पहिल्याच ऐतिहासिक गोदान सोहळ्याने रचला नवा अध्याय

राज्यातील पहिल्याच ऐतिहासिक गोदान सोहळ्याने रचला नवा अध्याय

Manora Cow-Worship Grand Ceremony: बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दीपावलीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसच्या शुभमुहूर्तावर भव्य व ऐतिहासिक गोदान आणि गोपूजन महासोहळा

Nov 05, 2026
मानोऱ्याच्या शेंदुरजना आढावमध्ये मटका जुगाराचा सुळसुळाट? तरुण पिढी धोक्यात; कारवाईची मागणी

मानोऱ्याच्या शेंदुरजना आढावमध्ये मटका जुगाराचा सुळसुळाट? तरुण पिढी धोक्यात; कारवाईची मागणी

मानोऱ्याच्या शेंदुरजना आढावमध्ये कथित मटका जुगाराचा सुळसुळाट? तरुण पिढी धोक्यात असल्याची चिंता; पोलीस प्रशासनाकडे नागरिकांची कठोर कारवाईची मागणी.

Nov 05, 2026
पोहरादेवीत आज वसुबारसच्या मुहूर्तावर भव्य गोदान महासोहळा; १ लाख २५ हजार गोदानाचे उद्दिष्ट

पोहरादेवीत आज वसुबारसच्या मुहूर्तावर भव्य गोदान महासोहळा; १ लाख २५ हजार गोदानाचे उद्दिष्ट

पोहरादेवी येथे वसुबारसला भव्य गोदान महासोहळा! धर्मगुरू बाबुसिंग महाराज यांच्या हस्ते पूजन, महाआरती आणि महादीपोत्सव; १ लाख २५ हजार गोदानाचे उद्दिष्ट.

Nov 05, 2026