Wasmat motorcycle theft: वसमत येथील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या तलाठ्याच्या घरासमोर उभी असलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
वसमत (Wasmat motorcycle theft) : वसमत येथील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या तलाठ्याच्या घरासमोर उभी असलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी वसमत शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. वसमत शहरातील शिवाजीनगर भागात तलाठी रामेश्वर दुर्गादास गिरी यांचे घर आहे. 25 मार्च रोजी दुपारच्या वेळेला त्यांच्या घरासमोर उभे असतील त्यांची मोटरसायकलला क्रमांक एम एच 38 यु 55 17 चोरट्याने चोरून नेली आहे.
घरासमोर उभे केलेली मोटरसायकल चोरीस (Wasmat motorcycle theft) गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मोटरसायकलची शोधाशोध केली. अनेक ठिकाणी शोधूनही सापडत नसल्याने शेवटी एक एप्रिल रोजी आणि वसमत शहर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीची तक्रार नोंदवली आहे. तलाठी रामेश्वर गिरी यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिराशे तपास करत आहेत.