Gondia drugs seized: गोंदिया पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक पावले उचलली. संजयनगर परिसरात १९.७ ग्रॅम एम.डी. क्रिस्टल पावडर जप्त केले आहे. आरोपी असलान खान याला अटक करण्यात आली.
शहर पोलिसांची मोठी कारवाई
गोंदिया (Gondia drugs seized) : शहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. या अनुसंगाने मागील आठवडाभरापासून सतत कारवाई केली जात आहे. यानुरूप संजयनगर परिसरात छापा टाकून ४ लाख ३३ हजार ४०० रुपये किंमतीचे १९.७ ग्रॅम मेथॉडान (एम.डी.) क्रिस्टल पावडर जप्त केले आहे. या प्रकरणी असलान ऊर्फ बाबु इकबाल खान (२१) रा.शास्त्री वार्ड, संजयनगर याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून मोबाईलसह एकूण ४ लाख ४३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, गोंदिया शहर पोलीस पथक २ मे रोजी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंगवर करीत होते. (Gondia drugs seized) दरम्यान संजयनगर येथील असलान खान हा आपल्या राहत्या घरी एम.डी. पावडर बाळगून त्याची विक्री करत आहे. अशी माहिती गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या आदेशानुसार पोलिसांनी दोन शासकीय पंच, फोटोग्राफर आणि वजनकाटा सोबत घेऊन आरोपीच्या घरावर छापा टाकला. घरझडती घेतली असता बेडरुममधील कोपर्यात असलेल्या लोखंडी पेटीत एका कापडी पिशवीत स्टीलच्या डब्यात लपवलेला पारदर्शक पॉलिथीनमधील मळकट रंगाचा पावडर मिळून आला. पंचांसमोर विचारणा केली असता आरोपीने तो पावडर मेथॉडान एम. डी. क्रिस्टल असल्याचे सांगितले. पोलिसांनी २२ हजार रुपये प्रति ग्रॅम दराने १९.७ ग्रॅम पावडर आणि १० हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला आहे.
या (Gondia drugs seized) प्रकरणी आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि वैभव गेडाम करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर पर्वते, सपोनि वैभव गेडाम, पोउपनि अनिल डोंगरवार, सफौ कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, दिपक रहांगडाले, निशिकांत लोंदासे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, कुणाल बारेवार, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे, विजय बिसेन यांनी केली.