Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > क्राईम जगत

Minor Accused

नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप; दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात

नालासोपारा परिसरात अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात

Minor Accused |

आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उघडकीस

नालासोपारा परिसरात अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीला आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप असून, त्यानंतर तिचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याची माहिती आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या घटनेप्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांविरोधात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रकरणाची गंभीर दखल घेत तुळींज पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना भिवंडी येथील बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास तुळींज पोलिसांकडून सुरू असून, घटनेशी संबंधित बाबींचा तपास केला जात आहे.

Related to this topic: