Manora Theft Case: मानोरातील दुकानात खरेदी करताना एका महिलेच्या थैलीतून ४२ हजार रुपये व १ हजार किंमतीचा मोबाईल चोरीला गेला.
अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
मानोरा (Manora Theft Case) : शहरातील एका कपड्याच्या दुकानात भुली येथील महिला गाऊन खरेदी करीत असताना तेथे असलेल्या अज्ञात महिलेने व तिच्या लहान मुलाने वायर च्या थैलीत असलेले ४२ हजार रुपये आणि एक जुना मोबाईल किंमत १ हजार रुपये असा एकूण ४३ हजार रुयाचा मुद्देमाल लंपास केल्याची (Manora Theft Case) घटना दिनांक २३ मार्च रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे की, फिर्यादी महिला सुरेखा शालिक लिंबोडे वय ४० राहणार भुली यांनी बचत गटाचे पैसे बँकेतून काढले आणि जवळ असलेल्या थैलीत एका लहान बॅग मध्ये ठेवले आणि कपड्याच्या दुकानात गाऊन खरेदी करण्यासाठी गेल्या.येथे बसुन गाऊन पाहत असताना थैली बाजूला ठेवली असता तेथे असलेल्या एका महिले सोबत असलेल्या एका लहान मुलाने थैलीतील पैसे लंपास केले. ही (Manora Theft Case) घटना दुकानातील सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणीं फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात महिले विरुद्ध कलम ३०३(२)बी.एन.एस प्रमाणे गुन्हा दाखल केला. अधिक तपास मानोरा पोलिस करीत आहेत.