Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

पाथरी अवैध वाळू वाहतुक

परभणीत होमगार्ड निघाला वाळू तस्कर पाथरीत अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई

Pathari illegal sand transport: पोलिस विशेष पथकाने पाथरी हद्दीत होमगार्डच वाहन मालक असलेल्या वाळू तस्करावर कारवाई; ६ लाख ६० हजार रुपयांचा जप्त मुद्देमाल, टिप्पर, ब्रास वाळू, मोटारसायकल जप्त


परभणीत होमगार्ड निघाला वाळू तस्कर पाथरीत अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई

Pathari illegal sand transport |

 

६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
टिप्पर, दोन मोटारसायकली व दोन ब्रास वाळू जप्त 
चालक, मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी/ पाथरी (Pathari illegal sand transport) : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अवैध वाळू वाहतुकी विरोधात शुक्रवारी  पहाटे मोठी कारवाई करत ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाहन चालक, वाहन मालक व पोलिसांचे लोकेशन देणाऱ्या एका इसमाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील वाहन मालक हा होमगार्ड असल्याची माहिती असून होमगार्डच वाळूतस्कर निघाल्याने खळबळ उडाली आहे .

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पाथरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्याविरोधात पेट्रोलिंग सुरू असताना शुक्रवार २९ मे रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास वडी गावाजवळील निवळी गोपेगाव रोड चौकात संशयास्पद टिप्पर वाहन आढळले. पोलिसांनी टिप्पर थांबवून चौकशी केली असता वाहनात (Pathari illegal sand transport) अवैधरित्या रेती वाहतूक होत असल्याचे समोर आले.

चालक गजानन प्रल्हादराव पांचाळ (रा. खेर्डा, ता. पाथरी) याच्याकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेला रॉयल्टी अथवा टीपी परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच ओम बापूराव काळे (रा. मरडसगाव) हा मोटारसायकलवरून पोलिसांचे लोकेशन देण्याचे काम करत असल्याची माहिती चौकशीत पुढे आली. दरम्यान वाहन मालक चंद्रसिंग एकनाथ नाईक (रा. माळीवाडा, ता. पाथरी) यानेही रेती वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे सांगितले.

या (Pathari illegal sand transport) कारवाईत एमएच १२ एचडी १२७२ क्रमांकाचा टिप्पर, दोन ब्रास वाळू, एमटी-१५ व एसपी शाईन या दोन मोटारसायकली असा एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोउपनि. संदीप शिंदे, पोउपनि. अर्जुन टरके, पोलीस अंमलदार यशवंत वाघमारे, शेख इर्शाद, सूर्यकांत ताटीकोंडलवार, गोविंद चुडावकर व लिंबाजी शिंदे , वाव्हळे यांच्या पथकाने केली.

Related to this topic: