Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > क्राईम जगत

हिंगोली पोलिस कारवाई

वाशीम-हिंगोली रोडवर पोलिसांची मोठी कारवाई

Hingoli Police Action: महारत्रा पोलीसने हिंगोली-वाशीम रोडवर एक मोठी कारवाई केली. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा (1.29 लाख रु.), पानमसाला (46,200 रु.), हुंडाई कार (7.38 लाख रु.) आणि मोबाइल जप्त


वाशीम-हिंगोली रोडवर पोलिसांची मोठी कारवाई

Hingoli Police Action |

 

साडेनऊ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व हुंडाई कार जप्त, दोघांना अटक

हिंगोली (Hingoli Police Action) : जिल्ह्यातील बासंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाशीम-हिंगोली रोडवर बासंबा पाटीजवळ पोलिसांनी मोठी कारवाई केली. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाल्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1 लाख 29 हजार 600 रुपयांचा गुटखा, पानमसाला, तंबाखू व एक मोबाईलसह तब्बल 7 लाख 38 हजार रुपये किमतीची हुंडाई कार असा एकूण 9 लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

बासंबा पोलीस ठाण्याचे अंमलदार संदीप उत्तमराव जाधव यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. दिनांक 30 मे  रोजी दुपारी 1 वाजता वाशीम ते हिंगोली रोडवरील बासंबा पाटी येथे ही कारवाई झाली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एमएच 14 जेए 5215 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या हुंडाई स्पॉन्झ आय 20 कारमधून प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी कार थांबवली व तपासणी केली. 

कारमध्ये सागर गुरुदत्त इंदोरीया , रा. कपडा गल्ली, हिंगोली आणि श्रद्धा जितेंद्र जैस्वाल व्यवसाय वकील, रा. कपडा गल्ली, हिंगोली हे दोघे मिळून आले. कारची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. यामध्ये डी बी सिग्नेचर फिनेस्ट नावाचा 60 हजार रुपये किमतीचा पानमसाला 40 बॉक्स, रजनीगंधा सुगंधित पानमसाला 46 हजार 200 रुपयांचे 33 बॉक्स, आर एम डी पानमसाला 8 हजार 400 रुपयांचे 14 बॉक्स आणि सेंट्रल तंबाखू 8 हजार 400 रुपयांचे 14 बॉक्स असा साठा होता. तसेच आरोपींकडून 15 हजार रुपये किमतीचा एक पोको कंपनीचा मोबाईलही जप्त करण्यात आला. 

आरोपींनी संगनमत करून शासनाने जनतेच्या आरोग्यास अपायकारक म्हणून प्रतिबंधित केलेल्या गुटखा व पान मसाल्याची चोरटी विक्री करण्यासाठी वाहतूक करताना मिळून आले. या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा  नोंद करण्यात आला असून (Hingoli Police Action) भारतीय दंड संहितेच्या अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संतोष वाठोरे व पोउपनि जमादार  करत आहेत. 

दरम्यान, जप्त केलेल्या हुंडाई कारला पाठीमागे नंबरप्लेट नसून काळ्या काचा लावण्यात आल्या होत्या व समोरील काचेवर वक्रदृष्टी असलेला सदृश्य चिन्ह होता. कारचा इंजिन नंबर D4FALM119198 व चेसिस नंबर MALBH514LLM024058 असा आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून आरोपींच्या इतर साखळीचाही शोध पोलीस घेत आहेत.

Related to this topic: