Parbhani fatal attack: परभणीत पूर्णा ते चुडावा रोडवर १३ मे दुपारी गैरकायद्याच्या मंडळीने साक्षीदारांची दुचाकी थांबवून श्लील हल्ले करून जीवघेणा प्रयत्न केले. आरोपींचा गुन्हा दाखल झाला.
पूर्णा ते चुडावा रोडवरील घटना; आरोपींवर गुन्हा दाखल
परभणी (Parbhani fatal attack) : पूर्णा येथील फिर्यादी व साक्षीदार हे दुचाकीवरुन जात असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जुन्या निवडणुकीच्या भांडणाच्या कारणावरुन जबर मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना १३ मे रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास पूर्णा ते चुडावा रोडवर घडली. याप्रकरणी १७ मे रोजी चुडावा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश मोहिते यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी व साक्षीदार दुचाकीने जात असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांची दुचाकी थांबविली.
जुन्या निवडणूक भांडणाच्या कारणावरुन अश्लिल शिवीगाळ करत लोखंडी रॉडने, फायटरने मारहाण (Parbhani fatal attack) करुन गंभीर जखमी केले. जीवे मारण्याच्या उद्देशाने सदर मारहाण झाली. या प्रकरणी सागर खल्लाळ, सचिन रेणगडे, विलास देसाई व इतर अनोळखी इसमांवर चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. श्रीकांत नारमोड करत आहेत.