Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > क्राईम जगत

महामार्ग भिषण अपघात

महामार्गावर ट्रकचा समोरासमोर भिषण अपघात एक ठार,3 गंभीर जखमी

Hingoli Highway Accident: 19 एप्रिल रोजी NH 161 रोडवर कामठा फाटा ब्रिजवर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. एक व्यक्ती ठार झाली असून तीन गंभीररित्या जखमी झाले.


महामार्गावर ट्रकचा समोरासमोर भिषण अपघात एक ठार3 गंभीर जखमी

Hingoli Highway Accident |

आखाडा बाळापूर (Hingoli Highway Accident) : 19 एप्रिल रविवारी रोजी पहाटे 4:40 वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रक समोरासमोर अपघात होउन एक जण जागीच ठार झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी नांदेड हलवण्यात आले.  सदर अपघात ठिकाणNH 161 रोडवर  कामठा फाटा ब्रिजवर झाला. महामार्गावर  रोडवर पुलाचे काम चालू असल्याने एका बाजूने वाहतुक चालु असून रात्री च्या वेळी चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून  समोरासमोर धडक लागुन अपघात घडला आहे.

 यातील ट्रक  क्. RJ 09 GC 0967 हा हिंगोली कडुन नांदेड कडे जात असतांना ट्रक क्र. GJ 31 T 9398 हा नांदेड कडुन हिंगोली कडे येत असतांना  डोंगरगाव पुल  येथे पुलाचे काम चालु असल्याने रोडचे एक बाजुने वाहतूक वळविण्यात आली होती सदर ट्रक. क्र. GJ 31 T 9398 व ट्रक  RJ 09 GC 0967 समोरासमोर जोराची धडक (Hingoli Highway Accident) अपघात झाला यात चालक आशीम सलीम घाची वय 30वर्षे रा. अरवली जिल्हा गुजरात जागीच ठार झाला असून तुफान गवारवाल राठोड वय 35 वर्षे रा.रावनखेडी ता.झालडा जिल्हा उज्जैन, बाबुलाल ज्ञानुराम मकवाना वय 40वर्षे रा. धाबलाहारदू ता.तुशना जिल्हा उज्जैन, हफीज आझम मुलतानी वय 35 वर्षे रा.मुदुसा अरवली गुजरात हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी महामार्ग पोलीस जमादार सोपान थिटे, गजानन कोरडे, प्रवीण राठोड पथकाने तातडीने धाव घेतली साळवा फाटा टोल रुग्णवाहीकाद्वारे जखमींना तातडीने आखाडा बाळापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलवले येथे प्राथमिक उपचार करून जखमी जास्त मार असल्याने नांदेड रूग्णालयात हलवण्यात आले.

पहाटेच्या सुमारास झालेल्या भिषण अपघातामुळे (Hingoli Highway Accident) मोठा आवाज झाला यामुळे महामार्ग पोलीस पथक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली अपघात एवढा भिषण होता ट्रक समोरासमोर धडकुन आत जखमी फसले होते साळवा टोल  क्रेन आणून वाहन बाजूला करून जखमी बाहेर काढून रूग्णालयात हलवून अपघात ग्रस्त वाहन रस्ता बाजूला करून महामार्ग पोलीस सोपान थिटे, गजानन कोरडे, प्रवीण राठोड व टोल पथकाने वाहतूक सुरळीत चालू केली.

Related to this topic: