Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

लातूर चंदन तस्करी

लातूर जिल्ह्य़ात चंदन गाभ्याची तस्करी करणारी टोळी सक्रिय; पोलीसांचे दुर्लक्ष

Latur sandalwood smuggling: लातूर जिल्हात चंदन गाभ्याची तस्करी करणाऱ्या टोळीची सक्रियता वाढली आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध व्यवसाय बेफामपणे सुरू आहे.


लातूर जिल्ह्य़ात चंदन गाभ्याची तस्करी करणारी टोळी सक्रिय पोलीसांचे दुर्लक्ष 

Latur sandalwood smuggling |

लातूर (Latur sandalwood smuggling) : अहमदपूर चाकूर तालुका आनंदवाडी येथील तुकाराम बुंदराळे, रामदास बुंदराळे, आणि नरसिंग बुंदराळे, तर चाकूर येथील शंकर उर्फ जाधव हा पटाईत आहे. आणि त्याचे कनेक्शन उदगीरमध्ये साईनाथ सोबत असल्याचे मागच्या कारवाई दरम्यान समोर आले आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्य़ातील अनेक भागात चंदनाचे गाभा काढून परराज्यात पाठविणार व्यापारी टोळी सक्रिय झाली आहे. 

नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांना (Latur sandalwood smuggling) पायबंद घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात कामकाज करणा-या विशेष पथकास लातूरवरून मध्यप्रदेशातील बु-हानपूरकडे एका आयशर वाहनातून चंदनाची वाहतूक होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानूसार दि. ५ एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, लोहा ते नांदेड रोडवरील सई हॉटेलजवळ पथकाने लातूरचे आयशर वाहनातील ५२ लाखांचे चंदन व साहित्य जप्त केले. 

त्यात एकूण ३६ लाख रुपये किंमतीचे १,४७० किलो वजनाचे चंदनाचे लाकूड मिळून आले. सदर वाहनात ड्रायव्हर तौफिक चांदपाशा देशमुख रा. चापोली, जिल्हा लातूर व सोबत तुकाराम शेषराव बुंदराळे रा. आनंदवाडी, चाकूर हे दोघेही उपस्थित होते. त्यांच्याकडून, अधिक माहिती मिळवली असता, सदर चंदनाचे लाकूड हे त्यांना उदगीर, आनंदवाडी, चापोली व केज, जिल्हा बीड येथून रामदास शेषराव बुंदराळे रा. आनंदवाडी व बाळासाहेब जाधव रा. केज, जिल्हा बीड यांनी वाहनात भरून दिल्याचे सांगितले.

मात्र लातूरच्या चंदनाची (Latur sandalwood smuggling) माहिती लातूरच्या पोलीसांना कशी काय नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे चंदन तस्करी करणाऱ्या टोळीचे लागेबांधे पोलिसांशी असल्याने सर्रास चंदनाची तस्करी होत आहे. मात्र अधिकारी बदलले की, या चंदन तस्करांचा पुन्हा हप्ते देऊन सुळसुळाट सुरू झाला आहे. त्यामुळे सध्या तरी औसा, उदगीर, चाकूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील चांबरगा, अहमदपूर, बोरगाव काळे, मुरूड, अशी अनेक जिल्ह्य़ातील ठिकाणे चंदनाची संकलन अड्डे आहेत.

Related to this topic: