Kanhan Burglary case: धरमनगर परिसरात अज्ञात चोरट्यां नी एका बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सौ. माधुरी रणजितसिंग ठाकूर
कन्हान (Kanhan Burglary case) : येथील धरमनगर परिसरात अज्ञात चोरट्यां नी एका बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सौ. माधुरी रणजितसिंग ठाकूर (वय ३८) यांनी कन्हान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी या आपल्या आजारी पतीला नागपुर येथील मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान त्यांच्या दोन्ही मुलांना तुमसर येथे नातेवाईकांकडे ठेवण्यात आले होते. (दि.२७) जुलै रोजी शेजाऱ्यांकडुन घरात चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या कन्हान येथे परतल्या. पोलिसांसह घराची पाहणी केली असता मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडलेले तसेच घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडलेले आढळले. (Kanhan Burglary case) चोरट्यांनी कपाटातील सुमारे ६०००० रू. किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व ११००० रू. रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याची तक्रार आहे. चोरी गेलेल्या ऐवजात सोन्याचे दागिने, कानातील जोड, नथ, मंगळसुत्रातील पदक, अंगठी, चांदीचे पैंजण तसेच इतर कागदपत्रांचा समावेश असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी कन्हान पोलीस अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवुन पुढील तपास करत आहेत.