kalmanuri Wife Murder: पत्नीच्या प्रेमसंबंधासाठी संशय असल्यामुळे पत्नीला खून करून मृतदेह व्हिरीत टाकण्याचा आरोप रामु सोलंके यांना देण्यात आलेला आहे.
कळमनुरी (kalmanuri Wife Murder) : प्रेमसंबंधाचा संशय घेत पत्नीचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील सेलसुरा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लासिना येथील आबासा रामदास देवकर यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून रामु श्रीरंग सोळंके (रा. झुनका बोराळा, ता. जि. वाशिम, सध्या रा. वसपांगरा, ता. कळमनुरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (ँर्ए) २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीनुसार, २९ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजल्यापासून ते २ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान सेलसुरा येथील नागरे यांच्या शेतातील विहिरीजवळ ही घटना घडली. आरोपी रामु सोळंके याने पत्नी शितल रामु सोळंके हिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत तिच्याशी भांडण केले. त्यानंतर रागाच्या भरात तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या (kalmanuri Wife Murder) प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे हे करीत असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंत्यविधी झाल्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात येऊन तोंडी फिर्याद दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस उपाधीक्षक कुंदन कुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक जमीर नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी भेट देऊन पाहणी केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान शितल रामु सोळंके हि २९ जून पासून बेपत्ता होती. या संदर्भात ३० जून ला कळमनुरी पोलीस ठाण्यात हरविल्या बाबतची नोंद घेण्यात आली होती.