Saloonkeeper Abduction:कळमनुरी येथे दिवसाढवळ्या एका सलून चालकाचे अपहरण झाले. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून कारसह आरोपींना पकडले. सलून चालकावर जबरदस्तीने कारमध्ये बसवून बाळापूरच्या दिशेने नेले होते.
पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून कारसह आरोपींना पकडले
कळमनुरी (Saloonkeeper Abduction) : शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका हेअर सलूनमध्ये काम सुरू असताना घडलेल्या थरारक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. एका महिलेसह तीन ते चार जणांनी सलून चालकासोबत वाद घालत मारहाण केली आणि त्यानंतर त्याला जबरदस्तीने दुकानातून उचलून कारमध्ये कोंबून घेऊन गेल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सलून चालक आपल्या दुकानात काम करत असताना अचानक काही जण तेथे आले. सुरुवातीला बाचाबाची झाली आणि त्यानंतर आरोपींनी सलून चालकाला मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये बसवून आखाडा बाळापूरच्या दिशेने नेले.
या (Saloonkeeper Abduction) घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिसांनी तात्काळ हालचाल करत संबंधित वाहनाचा शोध सुरू केला. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून कार अडवली आणि संबंधितांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. घटना दिवसाढवळ्या घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. नेमकी घटना कोणत्या कारणातून घडली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.