Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

परभणी गांजा प्रकरण

परभणीत गांजा प्रकरणातील फरार आरोपी जिंतुरातून जेरबंद

Parbhani Ganja Case: जिंतूर पोलिसांना पहाटे गुप्त माहितीनुसार शुक्रवारी आरोपीलाच्यावर धाव घेतल्याने जेरबंद करून त्याला ताब्यात घेतले. या कादव्यात एनडीपीएस कायद्याच्या खालील कलमांवर आधारित


परभणीत गांजा प्रकरणातील फरार आरोपी जिंतुरातून जेरबंद

Parbhani Ganja Case |

 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आरोपी जिंतूर पोलीसांच्या स्वाधीन

परभणी (Parbhani Ganja Case) : जिंतूर तालुक्यातील एनडीपीएस (गांजा) प्रकरणातील फरार आरोपीला परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिंतूर शहरातून अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी पहाटे सुमारे १२.१० वाजता जिंतूर शहर व परिसरात गस्त घालत होते. यावेळी जिंतूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक २७६/२०२६ मधील फरार आरोपी अभिजीत उर्फ बिल्ली सुभाष राठोड (वय ३०, रा. गणपती गल्ली, जिंतूर) हा त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणपती गल्ली परिसरात धाव घेतली.

आरोपीला संशय येऊ न देता परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानंतर (Parbhani Ganja Case) पोलिसांनी शिताफीने कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेला आरोपी एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम २०(ब), २(ब) व २२ अन्वये दाखल गुन्ह्यात फरार होता. आरोपीला पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी जिंतूर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाये तसेच पोलीस अंमलदार सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पोळ, सूर्यकांत फड, विलास सातपुते, मुकेश बुधवंत, पांडुरंग तूपसुंदर आणि चालक शहाणे यांचा सहभाग होता. (Parbhani Ganja Case) फरार आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेले हे यश जिल्हा पोलिसांच्या  गुन्हेगारां विरोधातील विशेष मोहिमेचा भाग मानले जात आहे.

Related to this topic: