Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > क्राईम जगत

जळगाव एमडी ड्रग्ज

जळगावात पाच ग्रॅम एमडी ड्रग्जसह तरुणाला अटक

Jalgaon MD Drugs: रामानंद नगर पोलिसांना मध्यरात्री शिव कॉलन्यातील मायकोश्री हॉटेल परिसरात एमडी (मेफेड्रोन) सह तयार केल्या ग्राहकांची वाटापेक्षा त्याचा समावेश आढळला


जळगावात पाच ग्रॅम एमडी ड्रग्जसह तरुणाला अटक

Jalgaon MD Drugs |

जळगाव (Jalgaon MD Drugs) :  वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी रामानंद नगर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत शिव कॉलनी परिसरातून एमडी (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थासह एका संशयिताला अटक केली. या कारवाईत सुमारे ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शिव कॉलनीतील मातोश्री हॉटेल परिसरात एक युवक एमडी विक्रीसाठी ग्राहकांची वाट पाहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नायब तहसीलदार, फॉरेन्सिक पथक, वजन-माप अधिकारी आणि व्हिडिओग्राफर यांच्या उपस्थितीत सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने आपले नाव कल्पेश रथसिंग (वय २६, रा. डोंगरी वाळकी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे सांगितले. त्याच्या दुचाकीच्या सीटखाली लपवून ठेवलेल्या प्लास्टिकच्या सात पुड्या जप्त करण्यात आल्या. फॉरेन्सिक तपासणीत त्या पुड्यांमधील पांढरी स्फटिकासारखी पावडर ही एमडी (मेफेड्रोन) असल्याचे स्पष्ट झाले. जप्त अमली पदार्थाचे वजन ५ ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत पोलिसांनी ५ ग्रॅम एमडी (अंदाजे किंमत २५ हजार रुपये), दोन सिमकार्डसह सॅमसंग एम-३२ मोबाईल (२० हजार रुपये) आणि काळ्या रंगाची दुचाकी (४० हजार रुपये) असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या साखळीवर प्रहार करणारी ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, या रॅकेटमागील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी रामानंद नगर पोलिसांकडून  तपास सुरू आहे.