Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > क्राईम जगत

लातूर जनावर तस्करी

जनावरे चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद' हरियाणाचे चौघे पसार

Latur cattle smuggling: लातूर मराठवाड्यातील ४१ जनावर चोरीसाठी आंतरराज्यीय टोळीच्या पट्ट्यामध्ये २४.६८ लाखांची रकम जप्त करण्यात यश मिळाले; सांख्यिकेने पोलिसांनी गुन्हा उघडले.


जनावरे चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद हरियाणाचे चौघे पसार

Latur cattle smuggling |

 

मराठवाड्यातील 41 गुन्हे उघड, २४.६८ लाखांची रोकड जप्त!

लातूर (Latur cattle smuggling) : जनावरे चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीचा लातूर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत परभणी जिल्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, हरियाणा राज्यातील इतर सहा सराईत गुन्हेगारांसोबत मिळून त्यांनी केलेल्या जनावर चोरीचे लातूर जिल्ह्यातील २४ आणि बीड, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतील १७ असे एकूण ४१ जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून २४,६८,०००/- इतकी रोकड जप्त करण्यात आली आहे.

 दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी आणिक गणेश शाखेच्या पथकाने किनगाव ते पिंपळखेड रस्त्यावरील शिरसाठवाडी फाटा परिसरात (Latur cattle smuggling) जनावरे चोरी करणारे हरियाणा राज्यातील सराईत गुन्हेगारासह काही आरोपी व्यवहारासाठी जमल्याच्या माहितीवरून घटनास्थळास वेढा घालताच आरोपींनी पिकअप वाहनातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून १) अतिक सुलतान कुरेशी (रा. गंगाखेड) जिल्हा परभणी, २) मुजाहिद बाबू खाटीक (रा. परभणी), ३) साजू गफार कुरेशी (रा. पालम जिल्हा परभणी) या तिघांना ताब्यात घेतले. तर ४) नियाज उर्फ महंमद नवाब (हरियाणा) व ५) आस मोहम्मद सिरदार (हरियाणा) यांच्यासह हरियाणा राज्यातील इतर चार साथीदार पसार झाले. आरोपींकडून जप्त करण्यात आलेली २४,६८,०००/- इतकी रोकड ही जनावरे चोरी करून मांस विक्रीतून मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

ही (Latur cattle smuggling) संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर, यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि पांडुरंग माने, पोउपनि राजेश घाडगे, अमर केंद्रे,  पोलीस अमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, मोहन सुरवसे, सुर्यकांत कलमे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, विजय पाटील, सिध्देश्वर मदने, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड,  राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, प्रेमदास राठोड, जमीर शेख, अंजली गायकवाड, शैलेश सुडे, हरी पतंगे, रामदास बाचीफळे, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर, श्रीनिवास जांभळे यांनी अत्यंत धाडस, चिकाटी व कौशल्याने यशस्वीरीत्या पार पाडली.

मराठवाड्यात विविध जिल्ह्यात चोरी...

प्राथमिक चौकशीत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती आणि विविध गुन्ह्यांतील तपशील समोर ठेवल्यानंतर आरोपींनी जनावरे चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींनी लातूर, बीड, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील विविध गावांमधून बैल, गायी, म्हशी, वासरे आदी जनावरे चोरी करून त्यांची कत्तल केली आणि मांस विक्रीतून लाखो रुपयांची कमाई केल्याचे कबूल केले.

या (Latur cattle smuggling) चौकशीतून लातूर जिल्ह्यातील २४ जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यामध्ये रेणापूर, जळकोट, लातूर ग्रामीण, उदगीर ग्रामीण, चाकूर, किनगाव, अहमदपूर, औसा, कासार शिरसी आदी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच बीड, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतील आणखी १७ जनावरे चोरीचे गुन्हे आरोपींनी कबूल केले असून संबंधित पोलीस ठाण्यांना माहिती देण्यात आली आहे. अशा प्रकारे एकाच कारवाईत तब्बल ४१ गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.