Parbhani Illegal liquor: मानवत शहरातील रामपुरी रोडवर विशेष पथकाने अवैध देशी दारूची वाहतूक करणारे दोन व्यक्ती ताब्यात घेतले गेले. त्यांच्या ताब्यातील ४ लाख १९ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलीस अधिक्षकांच्या पथकाची कारवाई ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
परभणी (Parbhani Illegal liquor) : मानवत शहरालगतच्या रामपुरी रोडवर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई करत देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणार्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील ४ लाख १९ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार ८ जून रोजी रात्री सुमारे ८.५० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
विशेष पथक क्रमांक ०२ चे पोह. शेख अस्लम इसमाईल शेख यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Illegal liquor) पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रामपुरी रोडवर एका पांढर्या रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (एमएच ०३ बीसी ६५२६) या कारमधून देशी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वाहन अडवले. यावेळी वाहन चालक बैल्ले नितीन रविद्र (वय २४, रा. सिरसिल्ला राजन्ना, करीमनगर, ह.मु. पोखर्णी) व त्याच्यासोबत असलेला विजयकुमार देवेंद्रे पम्परी (वय २१, रा. राजन्ना, करीमनगर, बेसीतवाडा, तेलंगणा, ह.मु. पोखर्णी) यांची चौकशी करण्यात आली.
वाहनाची झडती घेतली असता देशी दारूच्या बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला. (Parbhani Illegal liquor) कारवाईदरम्यान पोलिसांनी दारूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ४ लाख १९ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधितांकडे दारू वाहतूक अथवा विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात बैल्ले नितीन रविद्र व विजयकुमार देवेंद्रे पम्परी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई पोउपनि अर्जुन टर्वेâ, पोउपनि शिंदे, पोह.सय्यद इरशाद, पोह.सुर्यकांत ताटीकोंडलवार, यशवंत वाघमारे, असलम शेख, वावळे यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास मानवत पोलीस करत आहे.