Karwadi Gambling Raid: हिंगोली जिल्ह्यातील कारवाडी शिवारातील एक अवैध जुगारासाठी पोलिसांनी छापा मारा. यावेळी आठ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आले. नगद १० हजार ६०० रु. जप्त झाले.
हिंगोली (Karwadi Gambling Raid) : ग्रामीण पोलिस ठाणे हद्दितील कारवाडी शिवारातील दक्षता नगरमध्ये तिर्रट जुगार सुरू असताना पोलिसांनी छापा मारून आठ जणांवर गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, २६ जुलै रोजी कारवाडी शिवारातील दक्षता नगर मध्ये अवैध जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांना मिळाल्याने त्यांनी पोलिस पथकाला तात्काळ घटनास्थळी रवाना केले. यावेळी पोलिसांनी मारलेल्या छाप्यात नगदी १० हजार ६०० रुपये जप्त करण्यात आले.
या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शामराव जवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बंधू लक्ष्मण गडाळे, शेख साजेश शेख लाल रा. रिसाला बाजार हिंगोली, जुनेदखान गफारखान पठाण रा. आजम कॉलनी हिंगोली, शंकर प्रकाश सावळे रा. नवीन पोलिस कॉलनी हिंगोली, लक्ष्मण भानुदास वाव्हळ रा. दाटेगाव ता.जि. हिंगोली, निलेश पंडीत देशमुख रा. आनंद नगर हिंगोली, राहूल प्रकाश जाधव रा. रामाकृष्णा कॉलनी हिंगोली, शंकर नागोराव गिरी रा. भांडेगाव ता.जि. हिंगोली या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाळासाहेब खोडवे हे करीत आहेत.