Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

हिंगोली वयोवृद्ध मृतदेह

हिंगोली तालुक्यात वयोवृद्ध दांम्पत्याचा आढळला मृतदेह

Hingoli Dead Body: हिंगोली तालुक्यातील पारडा शिवारामधील एका वयोवृद्ध दंपत्त्याचा मृतदेह आढळल्यावर पोलिसांनी घटनेच्या प्रकारासंबंधीचा सांख्यिकीय तपास सुरू केला.


हिंगोली तालुक्यात वयोवृद्ध दांम्पत्याचा आढळला मृतदेह

Hingoli Dead Body |

पारडा शिवारातील घटना; घटनेमुळे परिसरात एकच खळबळ
घातपाताचा प्रकार असल्याचा संशय
दोन दिवसापूर्वी घटना घडल्याचा अंदाज

बासंबा (Hingoli Dead Body) : हिंगोली तालुक्यातील पारडा शेत शिवारामध्ये २० जून शनिवार रोजी एका वयोवृध्द दांम्पत्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर ही घटना घातपाताची असल्याचा संशय बळावला. शवविच्छेदनानंतर नेमकी ही घटना खुनाची की अन्य असल्याचे स्पष्ट होणार आहे. 

पारडा शिवारातील माळालगत बळीराम देवबा वाघमारे यांची जवळपास १२ एकर शेती असुन मागील अनेक वर्षापासून ते आखाड्यावर झोपडी बांधून वास्तव्यास राहत होते. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी कलावती बळीराम वाघमारे ह्या सुध्दा राहत होत्या. २० जून रोजी वाघमारे यांचा १५ वर्षीय  नातू आखाड्यावर असलेल्या विहिरीमध्ये पोहण्याकरीता गेला असता त्यांना आजी आजोबाचे मृतदेह दिसून आले. त्याने तात्काळ  ही माहिती घरी दिली. (Hingoli Dead Body) त्यानंतर त्यांच्या मुलासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

या बाबतची माहिती बासंबा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले. यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, बासंबा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक संदिप जमादार, शेख उमर, विष्णू पोले, सचिन मस्के, नामदेव हाके, महिला पोलिस कर्मचारी मिना सावळे व गृहरक्षक दलाचे जवान दाखल झाले होते. यापूर्वी फॉरेन्सिक पथकासह श्वॉन पथकही आले होते. बळीराम वाघमारे यांचा मृतदेह बाजेवर तर कलावती वाघमारे यांचा मृतदेह शेतामध्ये काही अंतरावर दिसून आला.

दांम्पत्याच्या डोक्यावर व गळ्यावर मोठ्या जखमाही दिसून आल्या. तसेच मृतदेह काळे पडलेल्या स्थितीत आढळून आले. त्यामुळे वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवार यांच्यासह पथकालाही घटनास्थळी बोलविले होते. ही (Hingoli Dead Body) घटना नेमकी घातपात की एखाद्या वन्य प्राण्याने त्यांच्या वर केलेल्या हल्यातून झाली या बाबतचा उलगडा मात्र होत नसल्याने दोन्ही मृतदेह हिंगोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी सायंकाळी आणण्यात आले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या घटनेला वाचा फुटणार आहे. मयत बळीराम वाघमारे व कलावती वाघमारे यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, नातू, नात असा परिवार आहे. घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांनी गुन्ह्याच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.