Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

सुकळी वीर जिल्हा परिषद शाळेतील घटना

चोरट्यांनी लंपास केले शाळेतील गॅस सिलेंडर

कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर जिल्हा परिषद शाळेतून चोरट्यांनी तिन गॅस सिलिंडर चोरून नेले यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून देण्याची पंचायत झाली आहे.


चोरट्यांनी लंपास केले शाळेतील गॅस सिलेंडर

Gas Cylinder |

आखाडा बाळापूर (Gas Cylinder) : कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर जिल्हा परिषद शाळेतून चोरट्यांनी तिन गॅस सिलिंडर चोरून नेले यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून देण्याची पंचायत झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर येथील जिल्हा परिषद शाळा पोषण आहार किचन शेड येथून १० मार्च रात्री ते ११ मार्च सकाळी ९वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी किचन रूम कुलूप तोडून दोन भारत कंपनीचे व एक  इंडेन कंपनी एक असे जुने वापरलेले ३ गॅस सिलिंडर (Gas Cylinder) कीमत ४५०० चोरून नेले. याबाबत मुख्याध्यापक नागोराव चांदोजी मेंडके फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून पुढील तपास बिटप्रमुख संतोष नागरगोजे करत आहे.

चोरट्यांनी लक्ष केले गॅस सिलिंडर

सध्या आखाती युद्धामुळे विविध भागात गॅस टंचाई आहे, मागणीनुसार वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नाही यामुळे चोरट्यांनीही शाळेतून (Gas Cylinder) गॅस सिलिंडर चोरी करून नेले आहे. गॅस सिलिंडर चोरी झाले असल्याने पोषण आहार शिजवून देण्यासाठी मोठी गैरसोय होते.

Related to this topic: