Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > क्राईम जगत

हिंगोली सायबर सेल

हिंगोली सायबर सेलची तत्परता; जेष्ठ वकिलांचे चुकून गेलेले 10 हजार रुपये 5 मिनिटांत परत

Hingoli Cyber ​​Cell: हिंगोलीमधील जेष्ठ विधीज्ञांचे 10 हजार रुपये चुकीच्या व्यक्तीकडे गेले. सायबर सेलने त्वरित कारवाई करून पैसे परत मिळवले.


हिंगोली सायबर सेलची तत्परता जेष्ठ वकिलांचे चुकून गेलेले 10 हजार रुपये 5 मिनिटांत परत

Hingoli Cyber ​​Cell |

हिंगोली (Hingoli Cyber ​​Cell) : येथे जेष्ठ विधीज्ञ रंभाजी हनुमंत शिंदे  रा. गणेश वाडी यांच्याकडून यात्रेसाठी पाठवत असलेली 10 हजार रुपयांची रक्कम 5 मे 2026 रोजी चुकून दुसऱ्या फोन पे नंबरवर गेली. समोरच्या व्यक्तीने अनेक विनंत्या करूनही पैसे परत केले नाहीत. शिंदे यांनी सायबर सेल हिंगोली येथे तक्रार दाखल करताच, पोलिसांनी अवघ्या 5 मिनिटांत कारवाई करून सदर रक्कम परत मिळवून दिली. 

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या सूचनेनुसार जेष्ठ नागरिक, महिला व मुलांच्या तक्रारींवर (Hingoli Cyber ​​Cell) हिंगोली पोलीस प्राधान्याने व तत्काळ कार्यवाही करतात. नागरिकांनी मदतीसाठी 112 या निशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related to this topic: