Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

हिंगोली रेती तस्कर

विदर्भातील रेती तस्करांची हिंगोली जिल्ह्यात दादागिरी

Hingoli sand smugglers: विदर्भातील रेती तस्करांनी हिंगोली जिल्ह्यात चांगलाच हैदोस घातला. त्याचा प्रत्यय गोरेगाव ते सेनगाव रस्त्यावर गोरेगाव चौफुलीवर दिसून आला.


विदर्भातील रेती तस्करांची हिंगोली जिल्ह्यात दादागिरी

Hingoli sand smugglers |

 

उपविभागीय अधिकार्‍यांवर दबंगगिरी दाखविल्याने दोघावर गुन्हा दाखल

हिंगोली (Hingoli sand smugglers) : विदर्भातील रेती तस्करांनी हिंगोली जिल्ह्यात चांगलाच हैदोस घातला. त्याचा प्रत्यय गोरेगाव ते सेनगाव रस्त्यावर गोरेगाव चौफुलीवर दिसून आला. ज्यामध्ये रेती तस्करांनी उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांच्यासह कर्मचार्‍यांवर दबंगगिरी करून रेतीचे टिप्पर पळवून लावल्याने गोरेगाव पोलिसात विदर्भातील दोन रेती तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

विदर्भातील वाशिम जिल्ह्यातून टिप्परमधून (Hingoli sand smugglers) अवैध वाळू हिंगोलीत आणली जात असल्याची माहिती घुटुकडे यांना मिळाली होती. त्यानुसार १४ मे रोजी  त्यांनी तलाठ्यासह गोरेगाव चौफुलीवर सापळा रचला. मध्यरात्री सेनगाव रस्त्यावर टिप्पर थांबवून चालक समाधान राऊत याची चौकशी केली. राऊतकडे वाळूसंबंधी कोणतीही कागदपत्रे नसल्याने टिप्पर पोलिस ठाण्यात नेण्याचे आदेश घुटुकडे यांनी दिले. इतक्यात बोलेरो जीपमधून संजय गोरे तिथे पोहोचला. त्याने जीप टिप्परसमोर आडवी लावून वाहतूक रोखली. चालक राऊतला पळवून लावत घुटुकडे यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र घुटुकडे यांनी तातडीने गोरेगाव पोलिसांना बोलावून घेतले.

सहाय्यक निरीक्षक हनुमंत भिंगारे, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे यांच्या पथकाने गोरे याला जागेवरच ताब्यात घेतले. (Hingoli sand smugglers) पोलिसांनी १५.२० लाखांचा टिप्पर व वाळू जप्त केली आहे. गोरेगाव पोलिस ठाण्यात उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी १५ मे रोजी तक्रार दिली. ज्यामध्ये टिप्पर क्रमांक एमएच ३७ टी ९९४९ यामध्ये शासनाचा कर चुकवून अवैध रेती / गौणखनिज चोरटी वाहतुक केली जात होती. टिप्पर चालकास वाहन गोरेगाव पोलिस ठाण्यात घेण्यास सांगितले असता त्याने टिप्पर पुढे घेण्यास मज्जाव केला.

तसेच पाठीमागुन आलेली बोलेरो जीप क्रमांक एमएच ३७ एडी ९९४९ चा चालक संजय रामचंद्र गोरे रा. तोंडगाव जि. वाशिम याने टिप्पर समोर बोलेरो जीप लावून शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्यांना अर्वाच्च भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने स्वत: सदर वाहन डिझेल टाकुन जाळून टाकण्याची धमकी देऊन टिप्परची चाबी चालकाकडून टिप्पर चालकास तेथून पळवून लावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी समाधान राऊत व संजय रामचंद्र गोरे रा.  तोंडगाव जि. वाशिम या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भिंगारे हे करीत आहेत.