Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

अवैध धंदा कारवाई

उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर रसाळ ठरले ‘सिंघम’

Police Officer Mayur Rasal: उपविभागीय पोलिस अधिकारी मयूर रसाळ व डॉ. नीलाभ रोहण यांच्या नेतृत्वाने हिंगोलीत 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये ८ ठिकाणी छापे मारून धंड्यांवर पडली. गुटखा, अवैध दारू, मटका


उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर रसाळ ठरले ‘सिंघम’

Police Officer Mayur Rasal |

 

पोलिसांच्या धडक कारवाईने अवैध व्यवसायीकांचा २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
हपोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांच्या हस्ते डीवाएसपी मयुर रसाळ यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मान पत्र बहाल

हिंगोली (Police Officer Mayur Rasal) : जिल्ह्यात अवैध धंद्यांचे जाळे तोडण्यासाठी पोलिसांनी उघडलेला एक महिन्याचा 'सर्जिकल स्ट्राईक' यशस्वी ठरला आहे. वाळू तस्करी, मटका, अवैध दारू आणि गुटखा विक्री करणार्‍यांवर आठ ठिकाणी छापे मारून हिंगोली पोलिसांनी तब्बल २१ लाख २२ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईचे शिलेदार ठरले उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर रसाळ, पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या आदेशावरून मयुर रसाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखा व भरवसा सेलला सोबत घेत थेट मैदानात उतरले.

गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी वाळू माफियांपासून गुटखा माफियांपर्यंत सर्वांनाच सळो की पळो करून सोडले. एका महिन्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये ८ गंभीर गुन्हे दाखल झाले. सर्वात मोठी कारवाई बासंबा येथे झाली. अन्न सुरक्षा कायद्याखाली धाड टाकून पोलिसांनी ७ लाख ३८ हजारांचा गुटखा साठा जप्त केला. सेनगावमध्ये वाळू माफियांवर कारवाई करत ७ लाख १० हजारांचे वाहन व वाळू ताब्यात घेतली. कळमनुरीत दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये ५ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल हाती लागला.

याशिवाय हिंगोली शहर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातंर्गत २७ हजार ५० रुपये,  ग्रामीणमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमातंर्गत छाप्यात २४०० रुपयाचा मुद्देमाल यासह मटका आणि अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई झाली. या धडाकेबाज कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी मयूर रसाळ यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. 'कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांमुळे खात्याची शान वाढते' अशा शब्दांत त्यांनी रसाळ (Police Officer Mayur Rasal) यांचे कौतुक केले. पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या या कौतुकाच्या थापेमुळे जिल्ह्यातील पोलीस दलाचे मनोबल सध्या उंचावले आहे. अवैध व्यवसायिकांमध्ये पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता धडकी भरली आहे. हिंगोलीत 'ऑपरेशन क्लीन' सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलीस दलाने दिले आहेत.