Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > क्राईम जगत

हिंगोली पोलिस कारवाई

हिंगोलीत पोलिसांचा दणका: 58 सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार

Hingoli Police Action: हिंगोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी 58 गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा, कलम 55 अन्वयाने एक महिन्यापासून एक वर्षापर्यंत हिंगोलीपासून हद्दपारी करण्याचा आदेश


हिंगोलीत पोलिसांचा दणका 58 सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार 

Hingoli Police Action |

 

गुन्हेगारी क्षेत्रात उडाली खळबळ;
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांच्या अवघ्या सहा महिन्याच्या कार्यकाळात मोठी कारवाई

हिंगोली (Hingoli Police Action) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आणि अवैध धंदे चालवणाऱ्या 58 जणांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. 

पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध दारू विक्री, जुगार- मटका, मालमत्तेविरुद्ध आणि शरीरा विरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. त्यानुसार कोंम्बिंग आणि ऑलआऊट ऑपरेशनद्वारे नियमित तपासणी करून या गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली. हे सर्व आरोपी वारंवार गुन्हे करीत असून त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने नागरिकांच्या मालमत्तेला आणि जीविताला धोका निर्माण झाला होता. 

या (Hingoli Police Action) कारवाईत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील 12, हिंगोली शहर 11, औंढा नागनाथ 7, सेनगाव 7, हत्ता 6, कुरुंदा 6, बासंबा 5, आखाडा बाळापूर 2 आणि नर्सी नामदेव हद्दीतील 2 अशा एकूण 58 सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी करून हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर सखोल तपासणी करून पोलिस अधीक्षकांनी या सर्वांना एक महिन्यापासून एक वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी हिंगोली जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. 

यामध्ये पोलीस ठाणे निहाय आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:

पोस्टे नर्सी नामदेव हद्दीतील संतोष  नारायण इंगोले, श्याम नारायण इंगोले रा. जवळा बु. ता. सेनगाव जि. हिंगोली पोस्टे औंढा नागनाथ हद्दीतील पुंजाजी बबन जोगदंड,  नागेश उर्फ नागोराव अशोक पावडे, कृष्णा काशीनाथ ढोबळे सर्व रा. आसोला ता. औंढा नाग. जि. हिंगोली, बालाजी नारायण वानखेडे, माधव किसनराव वानखेडे दोघे रा पुर ता. औंढा नागनाथ जि हिंगोली, केशव खुशाल रिठे, शंकर रामराव रिठे दोघे रा पिंपळदरी ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली पोस्टे हिंगोली शहर हद्दीतील शिवाजी पंडीत बांगर  वंजारवाडा हिंगोली ता जि हिंगोली, शेख शफिक शेख रफिक रा महादेववाडी हिंगोली ता जि हिंगोली, गजानन शिवाजी गुट्टे रा मंगळवारा बाजार हिंगोली ता जि हिंगोली, शेख इरफान शेख हबिब रा. महादेववाडी हिंगोली ता जि हिंगोली, दशरथ उर्फ बबन रामा यादव रा. रिसाला बाजार हिंगोली ता जि हिंगोली, शिवाजी रामराव काळे रा. गवळीपुरा हिंगोली ता जि हिंगोली, कन्हैया सिद्राम छिल्लेवाड , सिध्दार्थ सुदाम भिसे , शंकर चंपती काळे, अनिता शंकर काळे, पवन जयप्रकाश यादव सर्व रा रिसाला बाजार हिंगोली ता जि हिंगोली.

पोस्टे हिंगोली ग्रामीण हद्दीतील बेबीताई साहेबराव पवार  रा सिध्दार्थनगर हिंगोली, बाबाराव राजाराम लिंबुळे रा पांगरी, यशवंत संभाजी वाढवे रा पिंपरखेड, सदाशिव शिवराम खोरणे रा नवखा ता जि हिंगोली, तोलाजी तुकाराम कऱ्हाळे  रा डिग्रस कऱ्हाळे ता जि हिंगोली, शंकर प्रभु देवकर , दिगांबर प्रभु देवकर  सर्व आनंदनगर बळसोंड ता जि हिंगोली, विठ्ठल तानाजी माने दाटेगाव ता. जि. हिंगोली, महादेव जयवंता वाबळे रा साटंबा ता जि हिंगोली, अर्चना दिनेश पवार रा कलगाव ता जि हिंगोली, सुरेश रामा जाधव रा मस्तानशहानगर हिंगोली ता जि हिंगोली, कन्हैयालाल दर्शनलाल जैस्वाल रा. भोसी ता औंढा ना. जि हिंगोली.

पोस्टे हट्टा हद्दीतील दिलीप रामकिशन सवंडकर रा. टेंभुर्णी ता. वसमत जि. हिंगोली, बालाजी शशीराव कदम, गजानन शेषराव कदम दोघे रा. हयातनगर ता वसमत जि हिंगोली, अमोल दगडु खिल्लारे रा. परळी दशरथे ता वसमत जि हिंगोली, माधव काळोबा काळे रा हयातनगर ता वसमत जि हिंगोली , संजय भिमराव खाडे रा हट्टा ता वसमत जि हिंगोली पोस्टे बासंबा हद्दीतील  बाबासाहेब दत्तराव गडदे, कपिल बाबासाहेब गडदे  दोघे रा खेर्डा ता जि हिंगोली, शेख हारुन शेख सजन, शेख असलम शेख मुसा, शेख अलताफ शेख मुसा सर्व रा. पारडा ता. जि. हिंगोली पोस्टे सेनगाव हद्दीतील  गणेश कैलास मगर, ऋषिकेश सुभाष डांगे, बालाजी प्रल्हाद मगर, आशिष सदाशिव मगर, कृष्णा कैलास मगर, शिवशंकर हिम्मत मगर, विशाल उर्फ नारायण गजानन गवळी सर्व रा. वरुड चक्रपाण ता. सेनगाव जि. हिंगोली पोस्टे कुरुंदा हद्दीतील नामदेव भाउराव पोटे रा सिरळी ता वसमत जि हिंगोली, कैलास शेषेराव वानोळे रा. खांबाळा, यशवंत अंबादास गायकवाड रा दाभडी ता. वसमत जि. हिंगोली, सुदाम बाबुराव कऱ्हाळे या. परजना ता. वसमत जि. हिंगोली, बाबुराव विश्वनाथ हिवाळे व गजानन नारायण जामगे दोन्ही रा. पुयणी बु. ता. वसमत जि. हिंगोली पोस्टे आखाडा बाळापुर हद्दीतील शिवशंकर नारायण सुर्यवंशी रा. शेवाळा ता. कळमनुरी जि. हिंगोली, गजानन कामाजी बनसोडे ता. कळमनुरी जि. हिंगोली ही आहेत. 

समाजात शांतता नांदावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलिसांकडून भविष्यातही अशा प्रतिबंधात्मक कारवाया सुरूच राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related to this topic: