Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > क्राईम जगत

हिंगोली जुगार कारवाई

हिंगोली ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Hingoli Gambling Raid: कारवाडी शिवारात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर हिंगोली ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून तिघा जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण


हिंगोली ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Hingoli Gambling Raid |

हिंगोली (Hingoli Gambling Raid) : कारवाडी शिवारात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर हिंगोली ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून तिघा जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मौजे कारवाडी शिवारात अग्रवाल यांच्या प्लॉटिंगच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत काहीजन जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

गोपनीय माहितीच्या आधारे बाळासाहेब शिवाजी खोडवे यांनी पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे आरोपी पांडुरंग गणेश घुगे, संतोष गणेश घुगे, बालाजी भाऊराव घुगे, सर्व रा. सेलसुरा ता.जि. हिंगोली हे झन्ना मन्ना नावाचा जुगार पत्त्यावर पैसे लावून खेळताना मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळा वरून एकूण 2200 रुपयांची रोख रक्कम जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्ह्याचा तपास बाळासाहेब खोडवे हे करीत आहेत.

Related to this topic: