Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > क्राईम जगत

हिंगोली जिल्हा चोरी

हिंगोली जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपला; चोर्‍यांचे सत्र सुरूच

Hingoli district theft: जिल्ह्यात लागोपाठ अनेक ठिकाणी चोर्‍यांचे सत्र सुरूच आहे. कधी चारचाकी तर कधी दुचाकी वाहनासह घरफोडी, जबरी चोरीच्या घटना घडतच चालल्या आहेत.


हिंगोली जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपला चोर्‍यांचे सत्र सुरूच

Hingoli district theft |

 

जिल्ह्यात जबरी चोरी, घरफोडी, चारचाकी व दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या; गुन्ह्यांची उकल मात्र बोटावर

हिंगोली (Hingoli district theft) : जिल्ह्यात लागोपाठ अनेक ठिकाणी चोर्‍यांचे सत्र सुरूच आहे. कधी चारचाकी तर कधी दुचाकी वाहनासह घरफोडी, जबरी चोरीच्या घटना घडतच चालल्या आहेत. जिल्ह्यात वाढत्या चोरींच्या घटनांमुळे व्यापार्‍यासह सर्व सामान्य नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोर्‍यांवर अंकुश घालण्यात पोलिस यंत्रणा कमकुवत ठरत आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाक राहीला नसल्याचे बोलले जात आहे. 

हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी घरफोडी, जबरी चोरी यासह वाहन चोरीच्या घटना प्रत्येक दिवशी घडतच चालल्या आहेत. भरदिवसाही चोरीच्या घटना घडत असल्याने चोरट्यांवर पोलिसांचा धाक राहीला नसल्याचे नागरीकांतून बोलले जात आहे. एकीकडे वाढत्या चोर्‍या सुरू असताना त्याची उकल  करण्यात पोलिसांची यंत्रणा कमकुवत ठरत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी या वाढत्या चोर्‍यांवर अंकुश घालण्याकरीता पोलिसांची सक्षम यंत्रणा असणे गरजेचे आहे. 

हनुमान नगरात भरदिवसा घरफोडी:
हिंगोली शहरातील हनुमान नगर मध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली. ज्यामध्ये नगदी १० हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिणे असा एकुण १ लाख ९० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेल्याने हिंगोली शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील आमला येथील मंगल कैलास कामखेडे ह्या हनुमान नगरमध्ये किरायाच्या घरामध्ये राहतात. २९ ऑगस्टला सकाळी ११ ते दुपारी ३ च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेशकरून कपाटाचे लॉक तोडून आतमधील १ लाख ८० हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागिणे व नगदी १० हजार रुपये असा एकुण १ लाख ९० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात मंगल कामखेडे यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदन बनसोडे हे करीत आहेत. 

जोडतळा शिवारातून केबल चोरले:
तालुक्यातील जोडतळा शिवारात संतोष राजाराम जाधव या शिक्षकाचे शेत आहे. त्यांच्यासह आजुबाजूच्या शेतकर्‍यांच्या विहिरीवरील मोटारीचा केबल ४५०० रुपयाचा २७० फुट २८ ते २९ ऑगस्ट दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास डुकरे हे करीत आहेत. 

मोटार सायकलची चोरी:
हिंगोली ते सेनगाव रस्त्यावरील पुसेगाव पाटीजवळ उध्दव बानाजी रोडगे रा. जांभरून रोडगे यांची ३० हजार रुपयाची मोटार सायकल क्र.एम एच ३८ एस १९३१ ही चोरून नेल्याने नर्सी नामदेव पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला.

जरोडा शिवारातील सोलार प्रोजेक्टच १ लाख १९ हजार रुपये साहित्य चोरी
आखाडा बाळापूर:
कळमनुरी तालुक्यातील जरोडा शिवारातील सोलार प्रोजेक्टच १लाख१९ हजार २०० रूपये कीमतीचे साहित्य चोरी झाले याबद्दल आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कळमनुरी तालुक्यातील जरोडा शिवारातील रवींद्र एनर्जी लिमिटेड (मराठवाडा सोलार प्रोजेक्ट सेव्हन)या कंपनीच्या सोलार प्लाट मधील सोलार प्लेटला कनेक्शन देणारी १२०० मीटर केबल ६७ हजार २०० रूपये कीमतीचे व एम सी कनेक्टर ५०० जोड्या ५२००० हजार रुपयांची असा १लाख१९ हजार २०० रूपये किंमतीचे मुद्देमाल  २३ ते २४ ऑगस्ट दरम्यान लंपास केला आहे. याबाबत साईप्रसाद बाळासाहेब कल्याणकर फीर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शनाखाली बिट प्रमुख राजेश घोंगडे करत आहेत.

Related to this topic: