Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

हराळ घरफोडी प्रकरण

हराळ येथे घरफोडी करणारी टोळी जेरबंद; रिसोड पोलिसांकडून ६९ हजार ५०० रुपयांचे सोयाबीन व तूर जप्त

Haral Burglary Case: वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील हराळमध्ये घरफोडीच्या चोरांना पोलिसांनी अटक केली. आरोपी साखळीत साठवलेल्या ६९,५०० रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात यश प्राप्त झाले.


हराळ येथे घरफोडी करणारी टोळी जेरबंद रिसोड पोलिसांकडून ६९ हजार ५०० रुपयांचे सोयाबीन व तूर जप्त

Haral Burglary Case |

रिसोड/ वाशिम (Haral Burglary Case) : तालुक्यातील हराळ येथे बंद घराचे कुलूप तोडून सोयाबीन आणि तुरीची पोती चोरणाऱ्या तीन अट्टल चोरांना रिसोड पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला ६९ हजार ५०० रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून, या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, हराळ येथील रहिवासी आणि व्यावसायिक शेतकरी अजिंक्य विलास खैरे (वय ३० वर्ष) हे २९ जून २०२६ रोजी घराबाहेर गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. खोलीत साठवून ठेवलेली सोयाबीनची ७ पोती आणि तुरीची २ पोती चोरांनी लंपास केली. खैरे यांनी याप्रकरणी पोलीस स्टेशन रिसोड येथे रीतसर तक्रार दिली होती. त्यांच्या रिपोर्टवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना अटक

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास चक्रे फिरवली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी १) गजानन कुंडलीक सरकटे, २) अमोल माणिक सरकटे आणि ३) दीपक नामदेव सरकटे (सर्व रा. हराळ, ता. रिसोड, जि. वाशिम) यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेली सोयाबीनची ७ आणि तुरीची २ पोती, असा एकूण ६९ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

सदरची धडक कारवाई (Haral Burglary Case) वाशिमचे मा. पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे-पाटील साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम, आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पो.नि. रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, सचिन गोखले, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष अवगळे, आशिष पाठक, प्रशांत राजगुरु, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश मस्के, अमोल हाके, प्रवीण गोपनारायण आणि परमेश्वर भोणे यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावून गुन्हा उघडकीस आणला.