Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

गुन्हेगारांची टोळी जेरबंद

१७ पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला केले जेरबंद

Criminal Gang Arrest: विदर्भ आणि मराठवाडा येथे दरोडा टाकणारी आंतरजिल्हा गुन्हेगारांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. गुन्हेगारांकडून १६ लाख रुपये मुल्याचा मुद्देमाल जप्त.


१७ पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला केले जेरबंद

Criminal Gang Arrest |

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात दरोडा टाकणारी आंतरजिल्हा टोळी
स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या पथकाची कामगिरी

हिंगोली (Criminal Gang Arrest) : १४ मार्च रोजी फिर्यादी संदिप देवराव तनपुरे रा. नांदुरा देवी यांनी पोस्टे हिंगोली ग्रामीण येथे फिर्याद दिली होती त्यामध्ये संदीप तनपुरे हे १३ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान हिंगोली ते नांदुरा देवी  मोटार सायकलने जात असतांना जवळा पळशी रोडवर एक काळ्या रंगाची स्कार्पिओ गाडी उभी असलेली तनपुरे यांना दिसली व या स्कार्पिओ वाहनाने तनपुरे यांचा पाठलाग सुरु केला. खांबाळा गावच्या फौजी धाब्याच्या पुढे सदर स्कार्पिओ गाडी तनपुरे यांच्या मोटार सायकल समोर आडवी लावुन स्कार्पिओ गाडीतुन दोन इसम खाली उतरुन तनपुरे यांना जबरदस्तीने गाडीत टाकुन गाडीतील ईतर दोन ते तीन जणांनी मिळुन तनपुरे यांना लोखंडी कत्याने व पाईपने मारहाण केल्यानंतर त्यांच्या जवळचा मोबाईल व ४२ हजार रुपये आणि मोटार सायकलची चाबी असा मुद्देमाल जबरीने चोरून नेल्या वरुन अज्ञात आरोपी विरुध्द पोस्टे (Criminal Gang Arrest) हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास हिंगोली ग्रामीण ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक  श्रीदेवी वग्गे ह्या करीत आहेत.

या (Criminal Gang Arrest) गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन  यांनी सदर गुन्हा तात्काळ उघड करून आरोपींना तात्काळ अटक करण्या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले व हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांना सुचना देवुन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे विशेष तपास पथक नेमण्यात आले.

पोलीस पथकाने जवळपास २०० च्या वर सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास केला तसेच तांत्रीक विश्लेषन करून गोपनिय माहिती काढली असता सदर गुन्हा करणारी एक कुख्यात टोळी असुन सदर टोळी प्रमुख मुख्य गुन्हेगार हा सौरभ विलास शिंदे रा. फुलगाव ता. हवेली जि. पुणे याने त्याच्या टोळी मार्फत सदरचा दरोडा टाकुन मुद्देमाल लुटल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने पोलीस पथकाने गुन्हेगारांना पकडण्या संदर्भाने गोपनिय माहिती व तांत्रीक विश्लेषन केले असता सदरचे गुन्हेगार हे कोल्हापुर जिल्ह्यात कर्नाटक सिमे लगत असल्याची माहिती मिळाली त्यावरुन स्थागुशा पोलीस पथकाने कोल्हापुर जिल्ह्यात जावुन आरोपी सौरभ विलास शिंदे रा. पुणे नगर रोड सैनिक शाळे जवळ फुलगाव ता. हवेली जि. पुणे, शुभम प्रकाश तापकीर रा. आदर्श चौक भिमा कोरेगाव ता. शिरुर जि. पुणे, गजानन संजय मैंदकर रा. पेरनेगाव मसोबा नगर ता. हवेली जि.पुणे, अभिजित बंडु गदळे रा. वाघोली उबाळे नगर गल्ली नं. २७ ता. हवेली जि. पुणे व एक विधी संघर्षग्रस्त बालक हे स्कार्पिओ कार कं. एमएच १२ वाय.एन. ३३०० सह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे येथे हजर केले त्यांची अधिक विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व त्यानंतर लागलीच वाशिम जिल्ह्यात ट्रक चालकाला अडवुन दरोडा टाकल्याचे सांगीतले. तसेच गुन्ह्याच्या संदर्भाने टिप देणारा आरोपी  गजानन गोविंदा गोरे रा. सोनखास ता. जि. वाशिम असा असल्याचे निष्पन्न झाले असुन सदर आरोपीस यापुर्वीच अटक करण्यात आली आहे.

हे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांच्यावर पुणे व परिसरातील मालाविरुध्दचे १६ गुन्हे दाखल आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यात सन २०१७ मध्ये दरोडा टाकल्या संदर्भाने सुध्दा गुन्हा दाखल आहे. हे गुन्हेगार  सराईत असुन पुणे जिल्ह्यातुन हद्दपार असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीकडुन चोरी गेलेली रोख रक्कम २६ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ वाहन व मोबाईल असा एकुण १६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मिना, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  शिवसांब घेवारे, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, पोउपनि दिलीप मोरे, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, शिवाजी जालमिरे, साईनाथ कंठे, हरीभाऊ गुंजकर, नरेंद्र साळवे, ज्ञानेश्वर गोरे व आकाश टापरे, दत्ता नागरे, मारोती काकडे, इरफान पठाण, प्रणिता मोरे, शिवाजी इंगोले, संदिप जाधव, पांडुरंग राठोड, धनंजय क्षीरसागर, ज्ञानेश्वर पायघन, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, विक्की कुंदनानी सर्व ने. स्थागुशा हिंगोली यांनी केली आहे.

Related to this topic: