Vasmat Theft Crime: शहरात तोतयागिरी करून वृद्ध महिलेच्या अंगावरील भरदिवसा दागिने लंपास करणार्या एका चोरट्याला हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
तोतया गिरीने वृद्ध महिलेचे दागिने लंपास करणारी वसमत शहरातील घटना
वसमत (Vasmat Theft Crime ) : शहरात तोतयागिरी करून वृद्ध महिलेच्या अंगावरील भरदिवसा दागिने लंपास करणार्या एका चोरट्याला हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. ५ ऑगस्टला वसमत येथील बस स्थानका मागे रस्त्यावर फिर्यादी शांताबाई नामदेव कदम, रा. पारवा ता. वसमत या देवदर्शनाला जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना बनावट सोन्याचे बिस्कीट दाखवले. विश्वासात घेऊन त्यांच्या कानातील ६ ग्रॅम सोन्याचे काड्या व ३० तोळे चांदीचे कडे चोरून नेले.
या (Vasmat Theft Crime) प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकृष्ण लोढा यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. ९ जुलै रोजी आरोपी गणेश सुभाष वाघमारे रा. शिरूर तासबाव ता. अहमदपूर जि. लातूर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्हा व त्याचा एक साथीदार असल्याची कबुली दिली.
आरोपीकडून लंपास केलेले ६ ग्रॅम सोन्याचे काड्या व ३० तोळे चांदीचे कडे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. इतर आरोपीचाही लवकरच शोध लागेल असा विश्वास पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांनी देशोन्नतीशी बोलताना व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील आरोपी वसमतला येऊन महिलेला दिवसाढवळ्या लुटतात या प्रकरणात अन्य कोण्या स्थानिक आरोपीचा हात आहे का याचाही शोध पोलीस घेत आहे.