Girgaon DJ case: गिरगावमध्ये बिनपरवानगी डीजे वाजवणार्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात डीजे चालक, मालक व जयंती मंडळाचे आयोजक समाविष्ट आहेत.
वसमत (Girgaon DJ case) : तालुक्यातील कुरुंदा पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या गिरगाव येथे विनापरवाना डीजे वाजवून (Girgaon DJ case) कायद्याचे उल्लंघन केले म्हणून सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे यात डीजे चालक-मालक व जयंती मंडळाचे आयोजकांचा समावेश आहे.
वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नामदेव रामचंद्र कोटकर यांनी तक्रार दिली की ११ एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास मौजे गिरगाव येथे श्री राम जयंती मिरवणुक मध्ये अध्यक्ष, जंयती मंडळाचे आयोजक आणि डि. जे. चालक व डि. जे. मालक यांनी जयंती मिरवणुक परवानातील शर्तीचे उल्लंघन केले सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण संदर्भात घालुन दिलेल्या मानकाचे ,नियम व अटीचे उल्लघंन केले.
त्यांना आवाज कमी करणे, बाबत वेळोवेळी आदेश देवुन देखील त्याचे उल्लघंन केले. या (Girgaon DJ case) तक्रारीवरून कुरुंदा पोलिसांनी शुभम गणेशराव नादरे, संभाजी गुलाब नादरे, साईनाथ नागोराव साखरे, सौरभ जयराम नादरे चौघे रा. गिरगाव, निखील नागोराव थोरात रा. कनेरगाव, आयान चाउस फेसल चाउस रा. मोमीनपुरा नांदेड या सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.