Ghot police action: घोट पोलिसांनी आज पहाटे तीन आरोपींना अटक केली, जे 27 जनावरांना कत्तलीसाठी नेले जात होते. त्यातील 3 जनावरे दगावली. घटनेची पुढील तपास सुरू आहे.
तीन आरोपी जेरबंद; 27 पैकी 3 जनावरे दगावली...
घोट/गडचिरोली (Ghot police action) : चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरातील अनंतपुर येथुन कत्तलीसाठी नेली जात असलेली 27 जनावरे घोट पोलिसांनी आज पहाटे 5 च्या सुमारास 3 आरोपीना
ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त माहीतीनुसार या ऑयशर वाहन क्र. एम एच 34 बि. झेड 3509 मध्ये आरोपी नामे मोहम्मद मासूमअली मोहमंद सरवर वय 44 वर्षे रा.राजुरा अमरसिंग धरमदास धोती रा. अनंतपुर व निहाल शिवराम लाडसे वय. 30 वर्षे रा लक्कडकोट ता. राजुरा जि. चंद्रपुर प्रकरणी या 3 आरोपीना (Ghot police action) घोट पोलीसांनी अटक केली आहे.घोट पोलीस मदत केन्द्रांचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी गोपनीय माहिती आधारे काही व्यक्ती जनावरे घेऊन जात आहेत. सदर माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ स्थानिक संबंधित परिसरात गस्त घातली.शोधमोहीम राबवित असताना 3 व इतर संशयित व्यक्ती 27 जनावरे घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले.
आरोपीना तात्काळ ताब्यात घेण्यात आले तसेच घटनास्थळी पाळत ठेवण्यासाठी वापरलेली 2 वाहने जप्त करण्यात आली. अशा एकंदरीत 24 लाख 25 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला. (Ghot police action) घटनेची तपास प्रभारी अधिकारी किशोर शिंदे यांच्या मागदर्शनात सहाय्यक फौजदार दुलांल मंडल करित आहे. घोट पोलिसांनी संबंधितांविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा व इतर लागू कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.24 जनावरांना सायंकाळी चामोशी येथील गोशाळेत पाठविण्यात आले.सदर गोतस्करांना चामोर्शी न्यायालयात हजर करण्यात आले.चामोर्शी न्यायालयाने सदर आरोपींना 7 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.