Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

गंगाखेड बसस्थानक चोरी

परभणीत बैलजोडी विक्री करुन आलेली रोकड केली लंपास

Gangakhed Bus Station Theft: गंगाखेड तालुक्यात बैलजोडी विक्री करुन आलेले ८० हजार रुपये शेतकर्‍याने आपल्या खिशात ठेवले होते. गावाकडे जाण्यासाठी गंगाखेड बसस्थानकात आल्यानंतर बसमध्ये चढत असताना गर्दी


परभणीत बैलजोडी विक्री करुन आलेली रोकड केली लंपास

Gangakhed Bus Station Theft |

 

गंगाखेड शहर बसस्थानकातील प्रकार, गर्दीचा फायदा घेत चोरी

परभणी (Gangakhed Bus Station Theft) : गंगाखेड तालुक्यात बैलजोडी विक्री करुन आलेले ८० हजार रुपये शेतकर्‍याने आपल्या खिशात ठेवले होते. गावाकडे जाण्यासाठी गंगाखेड बसस्थानकात आल्यानंतर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सदर रक्कम लंपास केली. या प्रकरणी मंगळवार ९ जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंकट इमडे यांनी तक्रार दिली आहे.  फिर्यादी हे बैलजोडी विकण्यासाठी गंगाखेड येथील पशु बाजारात आले होते. दुपारच्या सुमारास त्यांनी बैलजोडी विक्री केली. यातून त्यांना ८० हजार रुपये मिळाले. शहरात काही खाजगी काम करुन दुपारी चारच्या सुमारास फिर्यादी हे गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकात आले.

गंगाखेड - अहमदपूर या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेले ८० हजार रुपये चोरुन नेले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने गाडीतून उतरुन आजूबाजुच्या लोकांना विचारणा केली. मात्र चोरट्याचा पत्ता लागला नाही. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.