Parbhani Police Fraud Case: गंगाखेड गावात भामटे लोक फिरत आहे. मी पोलिस अधिकारी आहे. तुम्ही अंगावर सोने घालून फिरू नका असे म्हणत वृध्दाच्या अंगावरील सोन्याची अंगठी, लॉकेट काढून घेत फसवणूक
परभणी (Parbhani Police Fraud Case) : गंगाखेड गावात भामटे लोक फिरत आहे. मी पोलिस अधिकारी आहे. तुम्ही अंगावर सोने घालून फिरू नका असे म्हणत वृध्दाच्या अंगावरील सोन्याची अंगठी, लॉकेट काढून घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना गंगाखेड शहरातील उड्डाणपुलाजवळ घडली. या प्रकरणी २६ जूनला अनोळखीवर गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी देसाई कासांडे वय -७२ वर्ष यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे मंगळवार १६ जून रोजी दुपारच्या सुमारास शेतातून घराकडून निघाले. त्यांची दुचाकी उड्डाणपुलावर पोहचली असता पाठीमागून दुसर्या दुचाकीवर अनोळखी इसम आला. त्याने फिर्यादीला थांबविले. संबंधिताने मी पोलिस अधिकारी आहे, अशी बतावनी केली. त्याने गावात भामटे फिरत आहेत, तुम्ही सोने घालून फिरू नका, असे म्हणत गळ्यातील ९० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट, ४५ हजार रूपये किंमतीची अंगठी काढायला लावली.
हे दागिने कागदाच्या पुडीत बांधून खिशात ठेवायला लावले. त्यानंतर संबंधित इसम निघुन गेला. फिर्यादीने खिशातील पुडीची पाहणी केली असता त्यांना नकली दागिने दिसून आले. फिर्यादीने आजूबाजूला शोध घेतला असता संबंधित इसम दिसून आला नाही. (Parbhani Police Fraud Case) भामट्याने पोलिस असल्याची बतावणी करत फिर्यादी जवळील १ लाख ३५ हजार किंमतीचे दागिने चोरून नेले. गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.