Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

दारूच्या मुद्देमालावर बुलडोजर

चार पोलीस स्टेशन मधील एक कोटीच्या दारूच्या मुद्देमालावर बुलडोजर

Gadchiroli Illegal Liquor: गडचिरोलीत पोलिसांनी अवैध दारूच्या मुद्देमालावर बुलडोजर चालवून नष्ट केले. या कार्याला वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.


चार पोलीस स्टेशन मधील एक कोटीच्या दारूच्या मुद्देमालावर बुलडोजर 

Gadchiroli Illegal Liquor |

अहेरी (Gadchiroli Illegal Liquor) : पोलीस स्टेशन अहेरी, वेंकटापूर, राजाराम (खा), पेरिमिली येथील विविध दारुच्या गुन्ह्रातील एकुण 1कोटी 32 हजार 675 रुपयांचा जप्त मुद्देमाल पोलीसांनी  प्रानहिता कार्यालयच्या बाजूला बुलडोजर चालवून आज वरिष्ठाच्या उपस्थितीत माल नस्ट केला, यात एकुण 159 गुन्ह्रांमधील मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या दारुची (Gadchiroli Illegal Liquor) वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे आदेशान्वये जिल्ह्रातील अवैध दारु विक्री करणा­यांवर कठोर कार्यवाही केली जात असते. त्याअनुसार विविध पोस्टे येथे दाखल गुन्ह्रांमध्ये जप्त मुद्देमाल हा नाशवंत असल्याने तसेच नवीन कारवाई दरम्यान देखील मुद्देमाल जप्त होत असल्याने जागे अभावी दीर्घकाळापासून प्रलंबित मुद्देमाल जतन करुन ठेवणे अडचणीचे ठरत असते.

यावरुन पोलीस स्टेशन अहेरी येथील सन 2024 ते 2025 या कालावधीतील दाखल एकुण 142 गुन्हयांमधील, व पोस्टे पेरमिली येथील सन 2025 ते 2025 या कालावधीतील दाखल एकूण 7 गुन्हयांमधील, व पोस्टे वेंकटापुर येथील सन 2025 ते 2025 या कालावधीतील दाखल एकूण 2 गुन्हयांमधील व  पोस्टे राजाराम येथील सन 2024 ते 2025 या कालावधीतील दाखल एकूण 8 गुन्हयांमधील, महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल दिनांक 02/04/2026 रोजी नष्ट करण्यात आला.     

सविस्तर वृत्त असे आहे की, मा. न्यायाधीश सा.व अधीक्षक सा., राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने दिनांक: 02/04/2026 रोजी पोस्टे अहेरी पोलीस निरीक्षक श्री. हर्षल एकरे यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक शु. के. चौधरी, सपोनि पटले, psi आनंद आवारे, योगेश महाजन, psi संतोष सडमेक व अमलदार यांच्यासह पोस्टे अहेरी हद्दीत सदरची कारवाई करण्यात आली असून अहेरी पोलिस स्टेशन मार्फत याप्रमाणे एकूण 1 कोटी 32 हजर 675 हजार रुपयांचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जेसीबिच्या सहाय्याने 15 बाय 15 फुटाचा खोल खड्डा खोदून रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाड जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लास्टीकच्या बॉटलांचा चुरा करण्यात आला त्यानंतर काचेचा चुरा व प्लास्टीकच्या चेपलेल्या बॉटल जेसीबीच्या सहाय्याने खड्ड्यात टाकून खड्डा पुर्ववत बुजविण्यात आला. सदर मुद्येमालाची विल्हेवाट लावताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली.

सदरची कारवाई (Gadchiroli Illegal Liquor) पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल  अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश तसेच अपर पोलीस अधिक्षक श्री. कार्तिक मधिरा, प्राणहिता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे व अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे,सपोनि पटले, psi आनंद आवारे, योगेश महाजन, psi संतोष सडमेक व अमलदार यांनी पार पाडली.

Related to this topic: