Farmers crime retreat: जे आरजखेडा, ता. रेणापूर येथील शेतकरी भीमराव शामराव सूर्यवंशी हे दोन बैल बाजारातून खरेदी करून गावी जात असताना तू खाटकाकडे बैल विक्रीस जात आहेत म्हणून शेतकऱ्यावर अन्याय
लातूर (Farmers crime retreat) : मौजे आरजखेडा, ता. रेणापूर येथील शेतकरी भीमराव शामराव सूर्यवंशी हे दोन बैल बाजारातून खरेदी करून गावी जात असताना तू खाटकाकडे बैल विक्रीस जात आहेत म्हणून शेतकऱ्यावर अन्याय करत लातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तो मंगळवार रोजी दुपारी परत घेण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे पोलीसांची समाज माध्यमात प्रतिमा मलीन झाली आहे.
शेतकरी शेतीसाठी बैल चालवत नेत असताना त्याच्या विरोधात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून बैल जप्त केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेकांनी कडवटपणे प्रतिक्रिया देत खेद व्यक्त केला होता. त्यामुळे त्या शेतकऱ्याचे बैल परत करण्यात आले असून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा माघार घेण्याची नामुष्की या पोलीसांच्या कृत्यावर ओढावली आहे. त्यामुळे समाज माध्यमात पोलीसांची प्रतीमा मलीन झाली आहे.
काल मध्यरात्री पाटोदा, ता. लोहारा येथील बैलबाजारातून दोन बैल खरेदी (Farmers crime retreat) करून भीमराव सूर्यवंशी व त्यांचा मुलगा पायी चालत लातूरकडे येत असताना वरील दोघेजन हे बैल खाटकाकडे नेत आहेत. असे म्हणत तथाकथित गोरक्षाकातर्फे शेतकरी अडवला गेला त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांने पोलीस मदत केंद्रात संपर्क करत मदत मागीतले मात्र मदत करण्याऐवजी लातूर येथील विवेकानंद चौक पोलीसांनी त्या शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करत बैल गोशाळेत पाठवले होते. लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्यापर्यंत त्या शेतकऱ्यास बैलासह चालवीत नेऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ ए (१) ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. पण हा गुन्हा आपल्या नाकर्तेपणामुळे दाखल करण्यात आल्याची समजूत झाल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांचे दोन्ही बैल परत केले व त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा माघार घेण्याची प्रक्रिया चालू आहे, असे वृत्त आहे.
शेतकरी भीमराव सूर्यवंशी (Farmers crime retreat) यांनी काल आपण बैल खरेदी केल्याचा दाखला दिला. आपले आधार कार्ड दिले, ओळख सांगितली. मी ४० एकर जमीन वहिती करतो हेही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. मी माळकरी आहे, मी बैल खाटकांना कसे विकेन, खाटकाला विकले जाणारे बैल भाकड असतात. असे बैल पाटोदा, ता. लोहारा ते लातूर कसे चालतील असाही बचाव केला होता. मात्र पोलिसांनी व तथाकथित गोरक्षाकातर्फे शेतकऱ्यालाच चोर ठरवले आणि गुन्हा दाखल केला. मात्र समाज माध्यमात व अनेक समाज सेवकांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणी बारी पोलीसांवरच पलटली आणि दाखल गुन्हा माघारी घेण्याची नामुष्की विवेकानंद चौक पोलीसांवर ओढावली. या प्रकरणात समाजसेवक युट्यूबवर रविराज साबळे व अन्य लोकांनी भेटी दिल्याचे समजते.