Car Bike Accident: दुर्गेश मथुरे, जो नुकताच लग्नबंधनात अडकला होता, त्याचा कार अपघातात मृत्यू झाला. याची घटना साटक गावाजवळ घडली, ज्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
अखेर गंभीर जखमी दुर्गेश मथुरे चा उपचाराचा दरम्यान मुत्यु
कन्हान (Car Bike Accident) : साटक वरून कन्हान-तारसा मार्गाने बोरी (सिंगोरी) ला स्वत:च्या लग्नाच्या फोटो सिलेक्ट करण्याकरिता दुचाकीने जाताना बोरी गाव बस स्टाप जवळ तारसा कडुन कन्हान कडे भरधाव वेगाने येणा-या हँग्यानर कारने दुचाकीला जोरदार धडक मारल्याने दुचाकी स्वार दोन मित्र गंभीर जखमी (Car Bike Accident) झाल्याने कामठी येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना अखेर तिस-या दिवसी रविवार (दि.२६) ला गंभीर जख्मी दुर्गेश मथुरे चा उपचारा दरम्यान मुत्यु झाला.
प्राप्त माहितीनुसार दुर्गेश सिताराम मथुरे वय ३० वर्ष यांचे ७ एप्रिल ला लग्न झाल्याने मित्र हर्षल भास्कर हिंगणकर दोघेही रा. साटक हे दुचाकी क्र. एमएच ४० एजे ६३३७ ने गुरूवार (दि.२३) एप्रिल २०२६ ला १०.३० वाजता साटक वरून बोरी (शिंगोरी) येथे लग्नाचे फोटो सिलेक्ट करण्यास जाताना दुपारी १२ वाजता दरम्यान कन्हान ते तारसा मार्गावर बोरी (शिंगोरी ) बस स्टाप मोडवर वळण घेत असताना तारसा कडुन कन्हानकडे जाणाऱ्या हँग्यानर कार क्र. एमएच ४० डीई ०५६९ चे चालकाने त्याचे ताब्यातील वाह न भरधाव वेगाने चालवुन दुचाकी ला जोरदार धडक मारल्याने दुर्गेश आणि हर्षल खाली पडुन दोघेही गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी खाजगी चौधरी रूग्णालय कामठी येथे नेऊन उपचार्थ दाखल केले.
दुर्गेशच्या डोक्याला, डाव्या हाताला, पंजावर आणि उजव्या पायाला जवळ मार लागला असुन, डावा पाय हालत नसुन फैक्चर झाल्याने आयसीओ मध्ये उपचार सुरू असताना रविवार (दि.२६) एप्रिल ला सकाळी ९ वाजता दुर्गेश ची मुत्युशी झुंज संपुन त्याचा मुत्यु झाला. (Car Bike Accident) उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे उत्तरिय तपासणी करून मुतकाच्या नातेवाईकाना मृतदेह स्वाधिन करण्यात आला. मुतक दुर्गेश मथुरे यांचे राहते घर साटक येथुन सायंकाळी अंतिम यात्रा काढुन स्मशान घाट साटक येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आला.
दुर्गेश मथुरे यांचे (दि.७) एप्रिल २०२६ ला रामटेक येथे लग्न झाले होते. गुरूवार (दि.२३) एप्रिल २०२६ ला २६ व्या दिवसी बोरी (सिंगोरी) बस स्टाप जवळ कार दुचाकीच्या अपघात (Car Bike Accident) दुर्गेश गंभीर जख्मी झाल्याने कामठी येथिल खाजगी रूग्णालयात मुत्युशी झुज देत रविवार (दि.२६) एप्रिला सकाळी ९ वाजता २९ व्या दिवसी दुर्गेश मथुरेची प्राणज्योत मावळल्याने मथुरे परिवारासह संपुर्ण साटक गाव परिसरात शोककळा पसरली आहे.