Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > क्राईम जगत

खुन आरोपी अटक

ड्रोनच्या मदतीने उसाच्या शेतातून खुनातील आरोपीला अटक

Murder Accused Arrested: जवळाबाजारमध्ये खुनातील आरोपी कृष्णा विलास सोनवणे याला पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने तांत्रिक तपासानंतर उसाच्या शेतातून अटक केली.


ड्रोनच्या मदतीने उसाच्या शेतातून खुनातील आरोपीला अटक

Murder Accused Arrested |

 

पोलिसांचा तांत्रिक तपास 

जवळाबाजार (Murder Accused Arrested) : येथे शनिवारी पहाटे उघडकीस आलेल्या खुनाच्या प्रकरणातील आरोपी कृष्णा विलास सोनवणे ( वय 29 वर्ष ) राहणार जवळा बाजार  याला पोलिसांनी तांत्रिक तपास करून ड्रोनच्या मदतीने उसाच्या शेतातून अटक केली आहे.

येथील ईदगाह नगर मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कंपाऊंडला लागून असलेल्या घरामध्ये मयत मनोहर बाबू आप्पा साखरे याचा खून करून आरोपीने ईदगाह नगर मधील एका रस्त्यावर प्रेत आणून टाकले होते. याप्रकरणी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. (Murder Accused Arrested) पोलिसांनी याप्रकरणी तपासासाठी चार पथके तैनात केली होती. आरोपी विरुद्ध कलम 302 व १०३ अन्वये गुन्हा  दाखल करण्यात आला होता.

आरोपी एका उसाच्या शेतात लपून बसल्याचे मोबाईल लोकेशन वरून आढळून आल्याने नेमका माग  काढण्यासाठी पोलिसांनी ड्रोन ची मदत घेऊन छापा टाकून आरोपीला अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीला औंढा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सायंकाळपर्यंत आरोपीची पोलीस कोठडी घेण्याची प्रक्रिया सुरू होती. (Murder Accused Arrested) औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपत राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळाबाजार पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही मोहीम फत्ते केली.

Related to this topic: