Anti-Bribery Department: जळगाव जामोद भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचारी, विश्वजीत विनायक सोनोने व सचिन सदाशिव वाजपेयी, शासकीय भूमि मोजणी कामासाठी लाच
दहा हजारांची लाच घेताना दोघे अटकेत
बुलढाणा (Anti-Bribery Department) : वडिलांच्या नावे असलेला प्लॉट मोजणी करता केलेल्या अर्जातील त्रुटी कमी करून प्लॉटची मोजणी करून देण्याच्या शासकीय कामासाठी जळगाव जामोद भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी तक्रार करताना दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्यानुसार सापळा रचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव जामोद भूमी अभिलेख कार्यालयातील विश्वजीत विनायक सोनोने व सचिन सदाशिव वाजपेयी या (Anti-Bribery Department) दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलं दोघांवर जळगाव जामोद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आलेली आहे.