Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

Commuter Safety

पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा; 'चार खून केलेत, पुढचा नंबर तुझा' म्हणत प्रवाशांना धमकी

मी आधीच चार खून केले आहेत, पुढचा नंबर तुझा आहे, अशी धमकी देत प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले.


पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा चार खून केलेत पुढचा नंबर तुझा म्हणत प्रवाशांना धमकी

Commuter Safety |

काही काळ लोकलमध्ये तणावाचे वातावरण; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मुंबई (Commuter Safety) : पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीने धिंगाणा घालत प्रवाशांना धमकावल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ लोकलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती मोठ्याने शिवीगाळ करत प्रवाशांशी वाद घालत होता. यावेळी त्याने "मी आधीच चार खून केले आहेत, पुढचा नंबर तुझा आहे," अशी धमकी देत प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले.

या घटनेदरम्यान मद्यधुंद व्यक्ती आणि काही प्रवाशांमध्ये शाब्दिक वादही झाला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, अखेरीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

या घटनेनंतर मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा घटनांवर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Related to this topic: