Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

गॅस सिलेंडर चोरी

कोरेगावातील तीन दुकान तोडून 'गॅस सिलेंडर' चोरी

Gas Cylinder Theft: कोरेगाव बाजार चौकात तीन दुकानातून गॅस सिलेंडर, बॅटरी, रोख रक्कम आणि इतर साहित्य चोरी झाली. पोलिसांनी चौकशी तीव्र केली आहे.


कोरेगावातील तीन दुकान तोडून गॅस सिलेंडर चोरी

Gas Cylinder Theft |

कोरेगाव,चोप/गडचिरोली (Gas Cylinder Theft) : देसाईगंज तालूक्यातील कोरेगाव बाजार चौकातील तीन दुकान तोडून गॅस सिलेंडर, बॅटरी,  रोख रक्कम व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 23 मार्च च्या मध्यरात्रीनंतर घडली.

देसाईगंज तालूक्यात कोरेगाव, चोप  हे परिसरातील मोठे बाजारपेठ आहे या बाजापेठेत शंकरपूर, चोप, कसारी, मेंढा, रानवाडी, टोली, बोळधा येथिल नागरीक सामान खरेदीसाठी कोरेगावात येतात शुक्रवार आपडी बाजार असतो. बाजार चौकात अनेक दुकाने आहेत बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तरी पण बाजार चौकातील तीन दुकानांची कुलूप तोडून मध्येरात्री चोरट्यांनी दुकानाने चोरी केली यात गोविंदा राजगिरे यांच्या नाश्ता च्या दुकान आहे. (Gas Cylinder Theft) गोविंदाच्या दुकानांमध्ये कुलूप तोडून घरगुती गॅसचा सिलेंडर व २००० रोख रक्कम चोरट्यांनी चोरी केल घरगुती सिलेंडर घरी नेण्यासाठी व्यवस्था नसल्याने सिलेंडर दुकानात ठेवला होता.

घरगुती वापरासाठी ठेवलेला नवीन सिलेंडर चोरट्यांनी नेला. व्यवसायासाईक सिलेंडरला हात सुद्धा लावले नाही तर तिथून 100 मीटर असलेल्या निमकर यांच्या कुरकुरे व पान विक्रीच्या दुकानाचे साखळी तोडून 12V 150 Ah ची बॅटरी व काही रोख रक्कम बिस्किटे व अन्य वस्तू पडविले लागूनच असलेले पोवळे यांचे नाश्त्याच्या हॉटेलमध्ये घुसले परंतु तिथून काही चोरट्यांना मिळाले नाही व ते खाली हाताने परतले याआधी अनेक छोट्या-मोठ्या चोऱ्या होत आहेत ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या, ट्रॅक्टरचे  सामान व इतर काही शेतातील मोटारी, पंपाचे कनेक्शन अन्य वस्तू  चोरटे चोरी करतात. काही दिवसाआधी मेश्राम यांच्या घरी वाळत टाकलेल्या तुरीचा एक पोता लंपास केला होता. या (Gas Cylinder Theft) घटनांकडे दुर्लक्ष केल्याने चोट्यांचे मनोधैर्य वाढलेले आहे.

चोरीची तक्रारारीनंतर देसाईगंज पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. तर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढावी व (Gas Cylinder Theft) चोरांचा बंदोबस्त करणाची मागणी कोरेगाव परिसरातील नागरीकान कडून केली जात आहे.

Related to this topic: