Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > क्राईम जगत

चिखली पोलिस कामगिरी

चिखली पोलिसांची मोठी कामगिरी; २.३० लाखांचे १९ मोबाईल हस्तगत

Chikhali Police Action: चिखली पोलिसांनी वाढत्या मोबाईल चोरीच्या तक्रारींवर कारवाई करत १९ मोबाईल, अंदाजे २.३० लाख रुपयांचे, हस्तगत केले आणि मूळ मालकांना परत केले.


चिखली पोलिसांची मोठी कामगिरी २३० लाखांचे १९ मोबाईल हस्तगत

Chikhali Police Action |

चिखली (Chikhali Police Action) : शहर व परिसरात गेल्या काही काळापासून मोबाईल हरविल्याच्या वाढत्या तक्रारींना गांभीर्याने घेत चिखली पोलिसांनी प्रभावी कारवाई करत तब्बल २ लाख ३० हजार रुपये किमतीचे १९ मोबाईल शोधून काढण्यात यश मिळवले आहे. ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल संबंधित मूळ मालकांना परत करण्यात आल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

चिखली पोलिस स्टेशन (Chikhali Police Action) हद्दीत मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वाढत असल्याने पोलिस प्रशासनासमोर हे एक गंभीर आव्हान बनले होते. या पार्श्वभूमीवर ठाणेदार भूषण गावंडे यांनी विशेष पथक स्थापन करून या पथकाला हरविलेले मोबाईल शोधण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. या पथकात पोलिस अंमलदार विजय किटे , सुनील राजपूत, निलेश सावळे तसेच महिला पोलिस अंमलदार रुपाली उगले यांचा समावेश होता. पथकाने विविध ठिकाणी मिळालेल्या माहितीसोबतच तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण १९ मोबाईल हस्तगत केले.

हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये रिअलमी, ओप्पो रेनो, रेडमी नोट ८, सॅमसंग, रिअलमी नार्झो, व्हिवो, वन प्लस, व्हिवो वाय १६ आदी कंपन्यांच्या मोबाईलचा समावेश आहे. या मोबाईलची स्वतंत्र किंमत ५ हजार रुपयांपासून २८ हजार रुपयांपर्यंत असून सर्व मोबाईलची एकूण किंमत २ लाख ३० हजार रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हरविलेल्या वस्तूंचा शोध घेऊन त्या मूळ मालकांच्या ताब्यात देणे हे पोलिसांसाठी विश्वासार्हतेचे काम मानले जाते आणि चिखली पोलिसांनी ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडल्याचे या कारवाईतून दिसून आले.

विशेष म्हणजे, या (Chikhali Police Action) कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असते, अशी सर्वसामान्य धारणा असताना चिखली पोलिसांनी योग्य नियोजन आणि समन्वयाच्या बळावर ती मोडून काढली आहे. त्यामुळे पोलिसांच्या दक्षतेचे आणि कार्यकौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई मा. पोलिस अधीक्षक श्री. निलेश तांबे, मा. अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलिस निरीक्षक भूषण गावंडे, पोउपनी शरद भागवतकर, पोहेकॉ विजय किटे, पोकॉ सुनील राजपूत, मपोकॉ रुपाली उगले तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग, बुलढाणा येथील पवन मखमले आणि कैलास ठोंबरे यांनी मोलाचे सहकार्य केले. चिखली पोलिसांची ही कारवाई केवळ गुन्हे उघडकीस आणणारी नाही, तर नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलिस दल किती तत्परतेने काम करत आहे, याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

हस्तगत मोबाईलमध्ये कोणत्या कंपन्या?
रिअलमी, ओप्पो रेनो, रेडमी नोट ८, सॅमसंग, रिअलमी नार्झो, व्हिवो, वन प्लस, व्हिवो वाय १६ आदी कंपन्यांचे एकूण १९ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले.