Chapalwara burglary: चापलवाडा चक येथे घरफोडी झाली; अज्ञात चोरट्याने १ लाख ९० हजार रुपयांची रोकड चोरली. घटना १ मे २०२६ रोजी घडली, पोलिस तपास सुरू आहे.
घोट (Chapalwara burglary) : घोटपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या चापलवाडा चक येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून १ लाख ९० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,धनराज गोसाई चलाख (वय ३८) हे ग्रामपंचायत चापलवाडा येथे संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. १ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास ते घराबाहेर असताना अज्ञात इसमाने त्यांच्या घराच्या स्वयंपाकघरावरील कवेलू काढून घरात प्रवेश केला. यानंतर (Chapalwara burglary) घरातील लोखंडी कपाटातील चोरकप्यात ठेवलेल्या एकूण २ लाख ७० हजार रुपयांपैकी १ लाख ९० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.
ही (Chapalwara burglary) घटना ४ मे २०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजता उघडकीस आली.या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध घोट पोलीस मदत केंद्रात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०५ (अ) व ३३१ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच घोट पोलिसांनी तत्काळ हालचाल करत गडचिरोली येथून श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले. त्यांनी घटनास्थळी पाहणी करून पुरावे संकलित केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार समीर रॉय व सिडाम करीत आहेत.