Mansar Terrible Accident: मनसर कांद्री तलाव परिसरात एक दुचाकीस्वार मृत्यूमुखी, तर एक जण गंभीर जखमी झाला. नागपूरकडून जबलपूरकडे जाणाऱ्या बसने धडक दिली.
रामटेक (Mansar Terrible Accident) : रामटेक तालुक्यातील मनसर कांद्री तलाव परिसरात काल रात्री भीषण अपघात घडून एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, नादिर खान नासीर खान (वय 23, रा. मनसर) हा त्याच्या पल्सर मोटारसायकलवरून त्याचा चुलत भाऊ अनवार जाफर खान याला मागे बसवून कामानिमित्त मनसरहून कांद्री वस्तीच्या दिशेने जात होता. दरम्यान, नागपूरकडून जबलपूरकडे जाणाऱ्या लाल रंगाच्या भरधाव बसने (Mansar Terrible Accident) त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही दुचाकीसह खाली पडले. अपघातात नादिर खान याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर अनवार जाफर खान याला डोक्याला व गुप्तांगावर मार लागून तो जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच, रामटेक पोलिसांनी (Ramtek Police) घटनास्थळी धाव घेतली. मृत नादिर खान याचा मृतदेह शासकीय रुग्णालय, रामटेक येथे शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. तर जखमी अनवार खान याच्यावर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, (Mansar Terrible Accident) अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे, हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. (Ramtek Police) पोलिसांकडून अज्ञात बस चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.