Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

दुचाकी वाहन चालक मृत्यु

ट्रकच्या धडकेत दुचाकी वाहन चालकाचा मृत्यु

Bike Driver Death: पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा खंडळा शिवारात पडोळे ढाब्या समोर ट्रकच्या धडकेत दुचाकी वाहन चालक विक्की महल्ले याचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी दोन्ही ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल


ट्रकच्या धडकेत दुचाकी वाहन चालकाचा मृत्यु

Bike Driver Death |

 

खंडाळा शिवारात भीषण अपघात, दोन ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान (Bike Driver Death) : पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा खंडळा शिवारात पडोळे ढाब्या समोर ट्रकच्या धडकेत दुचाकी वाहन चालक विक्की महल्ले याचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी दोन्ही ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
               
प्राप्त माहितीनुसार, कुणाल जयराम भडंग वय ३२ वर्ष रा. राधाकृष्ण नगर कन्हान आणि साळा विकी सुदर्शन महल्ले वय २८ वर्ष, रा. येसंबा (सालवा) या दोघांनी लिहीगांव येथे दर्पण ढाबा सुरु केला आहे. बुधवार (दि.२७) मे ला पहाटे ३.४५ वाजता लिहीगांव येथिल ढाबा बंद करून कृणाल आपल्या स्विफ्ट कार क्र.एम.एच.३१, ई.ए.७८२३ ने त्याचा मित्र सुनिल सुखराम मेश्राम वय ४५ वर्ष रा. छोटी अजनी, साई मंदिरच्या मागे याला घेऊन व कृणाल चा साळा विकी सुदर्शन महल्ले हा (Bike Driver Death) आपली दुचाकी वाहन मॅस्ट्रो मोपेड क्र.एम.एच.४०, ए.एस.४१७७ असे तिघेही सोबत निघाले. खंडाळा बॉयपास अंडरब्रिज पासुन साळा आपल्या मॅस्ट्रो मोपेड ने तारसा मार्गे घरी जाण्याकरि ता निघाला.

कृणाल आणि त्याचा मित्र रितीक ढाबा जवळ थांबले तेथे मित्र प्रदिप भुरे हा घरी जाण्याकरि ता साधन पाहत होता. त्यास गाडीत बसवुन त्या दोघां ना छोटी अजनी येथे सोडण्यास गेला. तेवढ्यात प्रदिप भुरे त्याचे मोबाईलवर फोन आला की, खंडाळा मार्गा वर पडोळे ढाब्या समोर पांढरी आणि लाल रंगाचा मॅस्ट्रो गाडीचा अपघात झाला. (Bike Driver Death) कृणाल मित्रासोबत घटनास्थळी गेला असता तेथे त्याचा साळ्याची मॅस्ट्रो मोपेड वाहन समोरुन चेपकलेल्या अवस्थेत दिसुन आली आणि महामार्गच्या बाजुला साळा पडलेला असुन त्याचे तोंडामधुन व नाकातुन रक्त निघत होते.  

तेथील लोकांनी सांगितले कि, पडोळे यांचे बंद ढाब्या वर ट्रक क्र एमएच ४० डीसी. ६९६२ हा उभा होता. तेव्हा कन्हान कडुन तारसा येथे जाणाऱ्या ट्रक क्र. एम एच ३३ टी ११२२ चे ट्रक चालकाने इंडीकेटर न देता अचानक पडोळे ढाब्याकडे वळन घेतल्याने साळा यांचे मॅस्ट्रो मोपेड ला कट लागुन ती मॅस्ट्रो गाडी उभा असले ला ट्रक क्र एमएच ४० डीसी. ६९६२ ला धडकल्याने कृणालचा साळा जख्मी झाला. जख्मीला स्विफ्ट कार ने कामठी उपजिल्हा रुग्णालय नेले असता तेथील डाॅक्टरांनी तपासुन मृत घोषित केले.

ट्रक क्र. एमएच ३३ टी ११२२ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने आणि निष्का ळजी पणाने चालवुन आणि ट्रक क्रं. एमएच ४० डीसी. ६९६२ च्या चालकाने आपले वाहन अनाधिकृतपने पार्क करून अपघातास कारणीभुत झाल्याने कन्हान पोलीसांनी कृणाल भडंग याच्या तक्रारीवरून दोन्ही ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.