औंढा नागनाथ युवती विनयभंग
औंढा नागनाथ तालुक्यात युवतीचा विनयभंग; गुन्हा दाखल
Aundha Nagnath girl molested: तालुक्यातील एका गावामधील १९ वर्षीय युवतीच्या घरासमोर जाऊन तिचा विनयभंग केल्या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिसात एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
Aundha Nagnath girl molested |
औंढा नागनाथ (Aundha Nagnath girl molested) : तालुक्यातील एका गावामधील १९ वर्षीय युवतीच्या घरासमोर जाऊन तिचा विनयभंग केल्या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिसात एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस ठाणे हद्दिमधील एका गावामधील १९ वर्षीय महिलेच्या घरासमोर निखिल गोपिचंद पालेवार याने जाऊन युवतीला अश्लिल भाषेत शिवीगाळ करून तिची ओढणी ओढून विनयभंग (Aundha Nagnath girl molested) करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात युवतीने दिलेल्या फिर्यादी वरून निखिल पालेवार याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जी.एस. राहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविकांत हरकाळ हे करीत आहेत.