Kanhan River Death Case: सत्रापुर जवळील कन्हान नदीवरील जुन्या पुलावरून पडुन अश्विनी ऊर्फ रश्मी ऊर्फ आशी डे वय २९ वर्ष, रा. खामला, नागपुर हिचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचे गूढ कन्हान पोलिस..
लग्नाच्या वादातुन पुलावरून धक्का दिल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष
आरोपीला ११ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी
कन्हान (Kanhan River Death Case) : सत्रापुर जवळील कन्हान नदीवरील जुन्या पुलावरून पडुन अश्विनी ऊर्फ रश्मी ऊर्फ आशी डे वय २९ वर्ष, रा. खामला, नागपुर हिचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचे गूढ कन्हान पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उकलले. या प्रकरणात आशिष ऊर्फ मोनु किशोर मनपिया वय ३१ वर्ष, रा. भिलगाव, ता. कामठी याला नागपुर येथील ऑटोमोबाईल चौक परिसरातुन ताब्या त घेत अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने ११ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कन्हान नदीवरील (Kanhan River Death Case) जुन्या पुलाजवळ मध्यरात्री महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन रेल्वे ट्रॅकमॅनने घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर महि लेचा मृतदेह नदी पात्रातुन बाहेर काढण्यात आला. सुरुवातीला ही आत्महत्या की घातपात, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, रेल्वे ट्रॅकमॅनच्या जबा बासह तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार अश्विनी डे आणि आरोपी मोनु मनपिया हे एकमेकांच्या परिचयाचे होते. अश्विनी ही गेल्या काही वर्षांपासुन आरोपीकडे लग्नासाठी आग्रह धरत होती, तर आरोपी लग्नास नकार देत असल्याचे तपा सात समोर आले आहे. दोघांमध्ये याच मुद्द्यावरून पूर्वीही वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेच्या दिवशी आरोपी खामला येथील अश्विनीच्या घरी गेला होता. ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने फिरायला जाण्याचे सांगुन तो अश्विनीला घेऊन निघाला. त्यानंतर दोघे मोपेडवरून कन्हान नदीवरील जुन्या पुलावर गेले. पुलावर एकांत असल्याने तेथे काही वेळ थांबुन गिफ्ट देऊन फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा त्यांचा कथित बेत होता. मात्र, तेथे दोघांमध्ये पुन्हा लग्नाच्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने अश्विनीला धक्का दिल्याने ती पुलावरून खाली पडली आणि तिचा मृत्यु झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.
घटनेच्या वेळी रेल्वे ट्रॅकमॅन मनीष आनंदप्रकाश वाघमारे रा. रामनगर, कन्हान पेट्रोलिंग करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकु आला. त्यांनी टॉर्चच्या प्रकाशात पाहिले असता महिला पुलावरून खाली पडताना दिसली. त्याचवेळी एका इसमाच्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश पडला. तो पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून घटनास्थळा वरून निघुन गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या जबाबामुळे प्रकरणाला घातपाताचा संशय निर्माण झाला आणि तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास पथकाला मार्गदर्शन केले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यां च्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवाधरे यांच्या नेतृत्वात (Kanhan River Death Case) कन्हान पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती, साक्षीदारांचे जबाब आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. त्यानंतर सापळा रचुन आशिष ऊर्फ मोनु मनपिया ला नागपुर च्या ऑटोमोबाईल चौक परिसरातुन ताब्यात घेण्यात आले. मंगळवार (दि. ४) ऑगस्ट ला त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली.
घटनेच्या वेळी वापरण्यात आल्याचे सांगितले जाणारे मोपेड दुचाकी अद्याप पोलिसांच्या हाती लाग लेले नाही. त्याचा शोध सुरू असुन घटनेमागे केवळ लग्नाचा वाद होता की आणखी काही कारण दडले आहे, याचाही पोलिस तपास करीत आहेत. आरोपी आणि मृत महि ला दोघांबाबत पूर्वीचे गुन्हेगारी संदर्भ असल्याची माहि ती तपासात समोर आली असुन या बाबींचाही स्वतंत्र पणे तपास केला जात आहे. मा. वरिष्ठ पोलिस अधीक्ष क हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान पोलिस निरिक्षक वैजयंती मंडवाधरे हयानी ही कारवाई केली. आरोपी सध्या कन्हान पोलिसांच्या ताब्यात असुन प्रकरणाचा पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.