Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

अपघातात पोलीस कुटुंब जखमी

भरधाव अँब्युलन्सची कारला जोरदार धडक

Ambulance Car Accident: देवगाव चौफुलीवर अँब्युलन्सने दिली कारला धडक, पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखडे व त्यांच्या परिवारातील सदस्य गंभीर जखमी; 8 वर्षीय मुलगी त्रिशा गतप्राण.


भरधाव अँब्युलन्सची कारला जोरदार धडक 

Ambulance Car Accident |

पोलीस अधिकाऱ्याचे कुटुंब गंभीर जखमी; आठ वर्षाची चिमुकली गतप्राण

देवगाव चौफुलीवरील धक्कादायक घटना

धामणगाव रेल्वे (Ambulance Car Accident) : देवगाव चौफुलीवर भरधाव वेगाने जात असलेल्या अँब्युलन्सने बुधवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान  तळेगाव दशासर येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखडे यांच्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या (Ambulance Car Accident) भीषण अपघातात पोलीस कुटुंबातील पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्या ८ वर्षीय लहान मुलीचा दुर्दैवी अंत झाला.

यवतमाळ मार्गावर असलेल्या देवगाव चौफुलीवर कायमच वाहनांची वर्दळ व गर्दी असते.बुधवारी तळेगाव दशासार पोलिसात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखडे वय ३८ हे आपली पत्नी रुपाली वय ३४ व तिसऱ्या वर्गात शिकणारी लहान निरागस मुलगी त्रिशा वय ८ हिला घेण्यासाठी तिच्या शाळेत शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे गेले होते.दरम्यान पत्नी व मुलीला घेऊन परत येतांना कार मध्ये पेट्रोल टाकावे यासाठी शाळेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल उपल्बध नव्हते.त्यामुळे त्यांनी पुलागाव मार्गावरील पंपावरकार मध्ये पेट्रोल भरले व आपल्या राहत्या घरी तळेगाव दशासर येथील पोलीस कॉर्टर कडे निघाले.

दरम्यान दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या आयटेन चारचाकी वाहन क्र. एम एच ३० ए झेड २९१० ने जात असताना देवगाव चौफुलीवर धामणगाव कडून यवतमाळ कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अँब्युलन्स वाहन क्र. एम एच २९ टी. ५८५७  ने त्यांच्या कार ला जोरदार धडक दिली. या (Ambulance Car Accident) भीषण अपघातात पोलिस उपनिरीक्षक राहुल वानखडे ३८ त्यांच्या पत्नी रुपाली राहुल वानखडे ३४ व लहान मुलगी त्रिशा राहुल वानखडे गंभीर जखमी झाले.उपस्थितांनी तिघांनाही यवतमाळ येथे हलविले असता जबर मार लागल्याने मुलगी त्रिशा हीचा दुर्दैवी मृत्यू झाला.अपघात इतका भीषण होता की भरधाव येणारी अँब्युलन्स कारला इतक्या वेगाने  धडकली की कार उध्वस्त झाली होती.

या (Ambulance Car Accident) अपघातात राहुल वानखडे व त्यांची पत्नी रुपाली यांच्या डोक्याला व छातीला जबर मार असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरु आहेत. सदरच्या अपघाताचा संपूर्ण प्रकार चौफुलीवरून सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.अँब्युलन्स मध्ये कोणताही रुग्ण नसताना अँब्युलन्स भरधाव वेगाने यवतमाळच्या दिशेने जात होती त्यामुळे वाचकाच्या बेजवाबदारपणामुळं पोलीस कुटुंबावर अपघात ओढवला असल्याने सर्वत्र रोष व्यक्त होत आहे.तळेगाव दशासर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस करीत आहेत.

त्रिशा वर्गात प्रथम आल्याचा आनंद ठरला शेवटचा

मागील काही महिन्यांपूर्वी राहुल वानखडे यांनी जिल्हा बदलीतून तळेगाव दशासर पोलीस स्टेशनला कार्यभार सांभाळला.मूळचे अकोला जिल्ह्यातील राहुल वानखडे त्यांची पत्नी रुपाली मुलगी त्रिशा यांच्यासह तळेगाव पोलीस कोर्टरला राहत असत.मुलगी त्रिशा मुळात हुशार होती. (Ambulance Car Accident) शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेत तिसऱ्या वर्गात त्रिशाने पहिल्याच वर्षी  प्रथम क्रमांक पटकावला.त्यासाठी कुटुंबाचे कौतुक करावे यासाठी. आई बाबांना शाळेत बोलावून त्यांना पेढे वाटून गोड वाटप करण्यासाठी कुटुंब शाळेत गेले होते.नियतिने घात केला व आनंद हा शेवटचा ठरला.दरम्यान परत येत असताना देवगाव येथील पेट्रोलपंपवर पेट्रोल भरून परत तळेगाव द. येथे जात पोलीस कुटुंबाच्या आनंदावर काळाच्या घाला घातला.निरागस मुलीच्या जाण्याने पोलीस विभाग व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related to this topic: