गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार; दोघांना परभणीला हलविले
गंगाखेड (Parbhani Students food poisoning) : वारकरी संस्थेतील अठरा विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवार १२ ऑक्टोबररोजी सकाळी गंगाखेड तालुक्यातील अकोली येथील भक्ती वेदांत वारकरी पिठ गुरुकुलात घडली. विद्यार्थ्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांना परभणीला हलविण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील अकोली येथील भक्ती वेदांत वारकरी पिठ गुरुकुलातील विद्यार्थ्यांना सोमवारी सकाळी अचानक उलटी, मळमळ, पोटदुखी, जुलाबाचा त्रास सुरू झाला. गुरु आकाश शास्त्री यांनी खाजगी वाहनाने प्रतिक वैâलास यादव, रामेश्वर श्रीधर माने, सोहम वसंत सानप, विनायक भागवत शिंदे, भागवत शुभम यमगर, पृथ्वीराज भास्कर बिडगर, गणेश बापूराव मदने, मंथन मोतीराम गुट्टे, समर्थ रुस्तूम देवकते, यश किसन माने, ऋषिकेश अशोक माने, अभिषेक विक्रम मुंडे, रमेश केशव ढाकणे, योगीराज मारोती सुरनर, ईश्वर गोविंद डिघोळे, जनार्धन दिगंबर पांढरे, कृष्णा रंगनाथ सावळे, कृष्णा बालासाहेब यमगर यांना रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नागनाथ निलंगेकर, डॉ. पी.आर. चट्टे, डॉ. मोहन मुलगीर, परिचारीका पल्लवी माने, अंकिता कदम, अश्विनी मुंडे, प्रज्ञा जोगदंड, भिमा राठोड यांनी प्रथमोपचार केले. प्रतिक यादव, रामेश्वर माने या दोघांना परभणीला हलविण्यात आले आहे.
विषबाधेचे कारण अस्पष्ट
वारकरी संस्थेतील ८० विद्यार्थ्यांनी रात्री एकच जेवण केल्याचे सांगण्यात येत असून त्यापैकी १८ विद्यार्थ्यांनाच विषबाधा (Parbhani Students food poisoning) कशी झाली, या बाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. विषबाधेचे कारण अद्याप स्पष्ट नाही.