Malaria Cases

मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; ४ वर्षांत रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढले

​​​​​​​मुंबईतील मलेरियाचे संकट कमी होण्याऐवजी पुन्हा वाढताना दिसत आहे.

मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; ४ वर्षांत रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढले

Malaria Cases

२०२२ मध्ये ०.३ असलेले वार्षिक परजीवी प्रादुर्भाव प्रमाण २०२५ मध्ये ०.८ वर; रक्त तपासण्यांचे प्रमाणही महत्त्वाचे

मुंबईतील मलेरियाचे संकट कमी होण्याऐवजी पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या दहा वर्षांची आकडेवारी तपासली असता मलेरियासाठी करण्यात आलेल्या रक्त तपासण्यांमध्ये परजीवी आढळण्याचे प्रमाण अपेक्षित पातळीवर घटलेले नाही. विशेषतः २०२२ नंतर मलेरियाच्या रुग्णसंख्येचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर आले आहे.

मलेरियाच्या परिस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी सकारात्मक रक्तपट्टी प्रमाण म्हणजेच स्लाईड पॉझिटिव्हिटी रेट, वार्षिक परजीवी प्रादुर्भाव प्रमाण (अॅन्युअल पॅरासाईट इन्सिडेन्स) आणि वार्षिक रक्त तपासणी प्रमाण (अॅन्युअल ब्लड एक्झामिनेशन रेट) हे प्रमुख निकष मानले जातात.

रक्त तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांपैकी ज्या नमुन्यांमध्ये मलेरियाचा परजीवी आढळतो, त्या प्रमाणाला सकारात्मक रक्तपट्टी प्रमाण म्हटले जाते. गेल्या दशकातील आकडेवारीत हे प्रमाण अत्यल्प राहिले असले तरी त्यामध्ये अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही. त्यामुळे मलेरिया नियंत्रणाच्या प्रयत्नांमध्ये अपेक्षित परिणाम साधला गेला नसल्याचे संकेत मिळतात.

दरम्यान, प्रत्येक हजार देखरेखीखालील लोकसंख्येमागे निश्चित झालेल्या मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण वार्षिक परजीवी प्रादुर्भाव प्रमाणातून स्पष्ट होते. २०२२ मध्ये हे प्रमाण ०.३ होते. त्यानंतर २०२३ मध्ये ते ०.५, २०२४ मध्ये ०.६, तर २०२५ मध्ये ०.८ पर्यंत पोहोचले. या वाढत्या आकडेवारीमुळे मुंबईत मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट होते.

मलेरियाचे रुग्ण वेळेत शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त तपासणी करणे आवश्यक आहे. मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत हिवतापासाठी होणाऱ्या रक्तनमुन्यांच्या तपासणीसाठी केंद्र सरकारने मुंबई महापालिकेला १२ टक्क्यांचे उद्दिष्ट दिले आहे. मलेरियाच्या प्रसारावर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी हे लक्ष्य गाठणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित सामग्री

एल निनोचा संभाव्य प्रभाव आणि पावसाच्या बदलत्या प्रमाणाची चिंता; मुंबई महापालिका जुन्या विहिरींकडे वळली

एल निनोचा संभाव्य प्रभाव आणि पावसाच्या बदलत्या प्रमाणाची चिंता; मुंबई महापालिका जुन्या विहिरींकडे वळली

एल निनो आणि पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेचा विहिरींच्या पुनरुज्जीवनावर भर. प्रभाकर शिंदे यांचे कामांना वेग देण्याचे निर्देश.

Oct 15, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईत रोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाते. गारगाईसारख्या तीन धरणांच्या क्षमतेइतकी ही नासाडी आहे.

Oct 03, 2026
ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला; आता मेट्रो सिनेमापासून होणार सुरुवात

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला; आता मेट्रो सिनेमापासून होणार सुरुवात

राज-उद्धव ठाकरेंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला. आता भायखळ्याऐवजी मेट्रो सिनेमा जंक्शनपासून मोर्चाला सुरुवात होणार.

Oct 02, 2026