Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आरोग्य

पेन फ्री महाराष्ट्र प्रकल्प

पेन फ्री महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत मेगा गुडघा व नितंब प्रत्यारोपण तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pain-free Maharashtra projects: ममता अँड मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन व संजीवनी हॉस्पिटल यांचे संयुक्त प्रयत्नांत 'पेन फ्री महाराष्ट्र' शिबिरात १,१४३ रुग्णांची तपासणी झाली.


पेन फ्री महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत मेगा गुडघा व नितंब प्रत्यारोपण तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pain-free Maharashtra projects |

रिसोड (Pain-free Maharashtra projects) : ममता अँड मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन तसेच संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या "पेन फ्री महाराष्ट्र" प्रकल्पांतर्गत १६ ते २१ जून  २०२६ दरम्यान वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेगा गुडघा व नितंब प्रत्यारोपण तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

सहा दिवस चाललेल्या या शिबिरात एकूण १,१४३ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ८९७ रुग्णांच्या एक्स-रे तपासण्या करण्यात आल्या, तर ३३२ रुग्णांना गुडघा किंवा नितंब प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले. सर्व नोंदणीकृत रुग्णांना आवश्यक औषधांचे वितरण करण्यात आले. (Pain-free Maharashtra projects) शिबिराचे आयोजन वाशिम जिल्हा रुग्णालय, यवतमाळ महिला व बाल रुग्णालय, मलकापूर येथील आमदार संचेती जनसंपर्क कार्यालय, बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महिला रुग्णालय तसेच रिसोड येथील समता सर्वस्व आरोग्य सेवा केंद्र येथे करण्यात आले. 

या (Pain-free Maharashtra projects) उपक्रमातून ग्रामीण भागातील अस्थिरोग उपचारांची मोठी गरज अधोरेखित झाली. अनेक वर्षांपासून सांधेदुखी, गुडघेदुखी व हालचालींवरील मर्यादा यामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, निदान व उपचार मार्गदर्शन मिळाले. विशेष म्हणजे शिबिरामध्ये तपासणी झालेल्या रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांची एक्स-रे तपासणी करण्यात आली, ज्यामुळे अचूक निदान आणि उपचार नियोजन शक्य झाले. रुग्णांची ऑपरेशन मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून मुंबई येथे संजीवनी म्हणता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत.

रिसोड येथे सलग दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांनाही मोठा प्रतिसाद मिळाला. दोन दिवस चाललेल्या शिबिरामध्ये २९३ रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी २६१ रुग्णांचे एक्स-रे करण्यात आले व ११४ रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता असल्याचे निष्पन्न झाले. "पेन फ्री महाराष्ट्र" या जनकल्याणकारी उपक्रमाबद्दल नागरिकांचा वाढता विश्वास आणि सहभाग दिसून आला. शिबिरामध्ये प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. नारायण खंडेलवाल. डॉ. शारीक अन्सारी यांनी रुग्णाची तपासणी केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी उत्तमचंदजी बगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली संत अमरदास अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे कर्मचारी, उत्तमचंद बगडिया  महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

संस्थेचे अध्यक्ष मधुसूदनजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून ममता अँड मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन व संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांनी राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सुलभ, परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला असून, "वेदनामुक्त महाराष्ट्र" घडविण्याच्या दिशेने हे शिबिर एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

Related to this topic: